न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : एड्स झाल्याचा चुकीचा रक्ताचा रिपोर्ट देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : एड्स झाल्याचा चुकीचा रक्ताचा रिपोर्ट देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

वैशाली या प्रसूतीसाठी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रसुतीपूर्व रक्त तपासणीत वैशालीला एड्सची लागण झाली असल्याचा रिपोर्ट दिला होता.

  • Share this:

16 एप्रिल : बातमी आहे न्यूज १८ लोकमतच्या इम्पॅक्टची. प्रसूतीसाठी आलेल्या निरोगी महिलेला एड्स झाला असल्याचा खोटा रिपोर्ट देऊन पंढरपूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयानं खळबळ उडवून दिली होती. न्यूज १८ लोकमतने ही बातमी दाखविल्यानंतर जिल्हा प्रशासनानं याची गांभीर्याने दखल घेतलीय.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन डॉक्टर आणि तीन प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. दरम्यान या निष्काळजी कारभारावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी ताशेरे ओढलेत. या विषयाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या पुणे उपसंचालकांना आपल्या कर्मचाऱ्यांची चूक झाली असल्याचा अहवाल पाठविलाय. जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपसंचालकांना पाठविलेल्या गोपनीय अहवालाची प्रत न्यूज १८ लोकमतच्या हाती लागलीय.

वैशाली या प्रसूतीसाठी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रसुतीपूर्व रक्त तपासणीत वैशालीला एड्सची लागण झाली असल्याचा रिपोर्ट दिला होता. या धक्कादायक रिपोर्ट नंतर गुरसाळकर कुटूंबाने पहिल्या रिपोर्टची शहनिशा करण्यासाठी दुसऱ्यावेळी रक्त तपासणी केली त्या तपासणीत वैशालीला एडस नसल्याची सुखद बातमी समजली.

उपजिल्हा रुग्णालयाच्या केवळ भोंगळ कारभारामुळे गुरसाळकर कुटुंब काही तास हवालदिल झाले होते. या कुटूंबाची मानसिक अस्वस्थता न्यूज १८ लोकमतने मांडल्यानंतर या बातमीची तातडीने दखल घेत पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. ए. बी. पुरी, डॉ. आशा घोडके, समुपदेशक पुरषोत्तम कदम, बाजीराव नामदे, प्रयोगशाळा तज्ञ एजाज बागवान यांना झालेल्या चुकीबाबत खुलासा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 

First published: April 16, 2018, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading