मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Fact Check : गारपिटीचा "तो" VIDEO हिंगोलीतला नाही, खरा VIDEO आला समोर

Fact Check : गारपिटीचा "तो" VIDEO हिंगोलीतला नाही, खरा VIDEO आला समोर

व्हायरल व्हिडिओतील दृश्य.

व्हायरल व्हिडिओतील दृश्य.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्या व्हिडिओबाबत माहिती समोर आली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Hingoli, India

मनीष खरात, प्रतिनिधी

हिंगोली, 19 मार्च : महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होत आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यात काही ठिकाणी थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यातच काल गारपिटाचा एक भयानक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील बाभळी गावात गारपीट झाली, असा आशयाचा हा व्हिडिओ सोशल माडियावर व्हायरल झाला होता. मात्र, न्यूज १८ लोकमतच्या टीमने या व्हिडिओची पडताळणी केली असता, हा व्हिडिओ हिंगोलीतील नसल्याचे समोर आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील बाभळी येथे गारपीट झाली म्हणून हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, हिंगोलीच्या बाभळीमध्ये अशी गारपीट झाली नाही. बाभळीला काल गारा पडल्या. परंतु लहान स्वरुपाच्या त्या गारा होत्या.

हा व्हिडिओ भात शेतीमधील व्हिडिओ दिसतो आहे आणि हिंगोलीत भात शेती केली जात नाही. त्यामुळे हा व्हिडिओ हिंगोली जिल्ह्यातील बाभळी येथील नाही.

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यातील काही ठिकाणी जोरदार गारपिटीनेही तडाखा दिला आहे. आज (ता. 19) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

First published:

Tags: Local18, Maharashtra rain updates, Rain, Rain updates