तुमचं प्रेम रोहितवर सदैव बरसत राहू द्या, काळजाला भिडणारी आईची साद!

तुमचं प्रेम रोहितवर सदैव बरसत राहू द्या, काळजाला भिडणारी आईची साद!

राजकारणातील हे रोहितचे सर्वात मोठे व जोखमीचे पाऊल होते. रोहितवर तुम्ही जे प्रेम, आपुलकी, विश्वास आणि जो जिव्हाळा लावला त्याची मी आयुष्यभर ऋणी राहील.

  • Share this:

मुंबई 25 ऑक्टोंबर : सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेला कर्जत-जामखेचा निकाल लागला आणि राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला. पवार घराण्याचा नवा सदस्य या निवडणुकीत राजकारणात आला. रोहित पवार आमदार झाल्याने राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांना आनंद झाला. अतिशय अटीतटीच्या या लढाईत रोहित पवारांच्या विजयाचा आनंद त्यांच्या आई सुनंदा पवार यांनीही लपविता आला नाही Facebookवर पोस्ट लिहून त्यांनी आपल्या ह्रदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या. यात जशी आईची काळजी आहे तसच राहित यांना त्यांनी जबाबदारीची जाणीवही करून दिलीय. तुमचं प्रेम रोहितवर सदैव बरसत राहू द्या असं काळजाला भिडणारं आवाहनही त्यांनी केलंय. तर रोहित पवारांनीही फेसबुकवर पोस्ट लिहून कृतज्ञता व्यक्त केली होती. तसच यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालण्याची ग्वाही दिली होती.

आमदार रोहित पवारांची भावनिक FB पोस्ट, शरद पवारांविषयी व्यक्त केल्या भावना!

काय म्हणाल्या राहित पवारांच्या मातोश्री?

राजकारणातील हे रोहितचे सर्वात मोठे व जोखमीचे पाऊल होते. कर्जत-जामखेडला त्यांची सर्वात जास्त गरज असल्याचे रोहितला लक्ष्यात आले आणि त्याने इथे निवडणूक लढविण्याचे ठरवले आणि तो जिंकला ही.

मूळात, आजचा विजय हा रोहितचा नाही तर, त्या यशोदा मातांचा आहे, ज्यांनी रोहितला त्यांचा ओटीत घेतलं. आजचा विजय त्या वानर सेनेचा आहे ज्यांनी निस्वार्थीपणे रोहितच्या पाठीमागे उभे राहिले आणि हा विजय त्या तरुणाचा ही आहे ज्यांनी दारूला झुगारून रोहितचे हात बळकट केले.

मी, राजेंद्र दादा व आमचे पवार कुटुंबीय रोहितच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मित्रपक्ष, कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, आणि माझ्या कर्जत-जमखेड ग्रामस्थ, महिला, बच्चेकंपनी, माझे तरुण युवक-युवती आपणा सर्वांचेच मनापासून आभार मानते. खरं तर आभार मानुन मी आपणाला परकं करत नाही परंतु रोहितवर तुम्ही जे प्रेम, आपुलकी, विश्वास आणि जो जिव्हाळा लावला त्याची मी आयुष्यभर ऋणी राहील. तुमचं प्रेम रोहितवर सदैव बरसत राहू द्या हीच विनंती!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 10:43 PM IST

ताज्या बातम्या