विरेंद्र उत्पात (प्रतिनिधी)01 जानेवारी: देशभरात नव्या वर्षाचं मोठ्या उत्साहात आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली जात आहे. सिध्दीविनायक, शिर्डी साईमंदिर आणि दगडू शेठ गणपती मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. पाहाटेपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरही सजलं आहे.
राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मांनी मंदिर समितीने नव वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक लव्हेन्डर फुलांनी सजवण्यात आलं. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत लव्हेन्डर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पाहून मन प्रसन्न होतं. देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात.
देवाचा गाभारा ,सोळखांभी मंडप ,चौ खांभी मंडप फुलांनी सजवला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. नव वर्षानिमित्तानं लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनाला येत असतात अशावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था करण्यात येते.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वेगवळ्या सणांनाही खास आकर्षक सजावट केली जात असते. ही सजावट मोहक असते. यंदाही विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यास शोभाच्या फुलांनी सुंदर अशी सजावट मंदिर समिती तर्फे करण्यात आली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारात येताच मन प्रसन्न होऊन जातं. आजच्या खास दिवसासाठी ही लव्हेंडर फुलांची केलेली सजावट मनाला मोहित करणारी आहे. आज नव्या वर्षाची सुरुवात विठुरायाच्या दर्शनाने करण्यासाठी देशभरातून विठुरायाच्या दर्शनाला लाखो भाविक येत आहेत.
हेही वाचा-NEW YEAR 2020: नवीन वर्ष चांगलं जावसं वाटतंय? मग या 10 गोष्टी नक्की करून पाहा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.