नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्याचा अमृता फडणवीसांचा हटके अंदाज!

नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्याचा अमृता फडणवीसांचा हटके अंदाज!

'नवीन वर्षासाठी तुम्ही जो संकल्प कराल तसंच तुमच्यासाठी नवं वर्ष राहणार आहे.'

  • Share this:

मुंबई 31 डिसेंबर : नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी सोशल मीडियावर सध्या शुभेच्छांची रेलचेल सुरू आहे. प्रत्येक जण आपल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा देत 2018 ला निरोप देतोय तर 2019 चं स्वागत करतोय. कायम काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यामुळं चर्चेत राहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही नवीन वर्षांच्या जरा हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर आपला एक खास फोटो टाकत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. "नवीन वर्षासाठी तुम्ही जो संकल्प कराल तसंच तुमच्यासाठी नवं वर्ष राहणार आहे. त्या आव्हानाचा मुकाबला करण्याची सुरूवात झाली आहे. तुमच्यातलं ते काही सर्वोत्तम असेल ते देण्याचा प्रयत्न करा." असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

या ट्विटसोबत त्यांनी जो फोटो टाकला तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. हॅपी मूड मध्ये असलेल्या अमृता फडणवीस बंदुकीतून निशाणा साधत आहेत असा तो फोटो आहेत. आपलं जे लक्ष्य आहे त्यावर नेम धरून काम करा असा त्यांना संदेश त्यातून द्यायचा आहे.

या फोटोवर नेटकऱ्यांनी टीका केलीय. तर काहींनी कौतुक.  या आधीही अमृता फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, "माझे निर्णय मी घेते आणि माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे. मला कायम मुख्यमत्र्यांच्या प्रतिमेशी जोडू नका."

VIDEO : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील 'ती' कोण? पहिल्यांदाच कॅमेरात कैद

First published: December 31, 2018, 8:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading