Home /News /maharashtra /

महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा नवा रेकॉर्ड, एका दिवसात दिले इतके लाख डोस

महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा नवा रेकॉर्ड, एका दिवसात दिले इतके लाख डोस

शनिवारी महाराष्ट्र राज्यानं लसीकरणात (Maharashtra Corona Vaccination) एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

    मुंबई, 05 सप्टेंबर: राज्यात (Maharashtra) कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रार्दुभाव हळूहळू कमी होत आहे. कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आल्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. अशातच राज्यात लसीकरण (Corona Vaccination) मोहिम वेगानं राबवली जात आहे. त्यातच शनिवारी महाराष्ट्र राज्यानं लसीकरणात (Maharashtra Corona Vaccination) एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. राज्यात शनिवारी 11.91 लाख नागरिकांना कोरोनाचे डोस देण्यात आले. यासह, एका दिवसात लसीकरणाबाबत राज्यात नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. यापूर्वी 21 ऑगस्ट रोजी राज्यात एका दिवसात 11.04 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लशीचे डोस देण्यात आले होते. ही माहिती महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भारी राव! पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर वन आरोग्य विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार शनिवारी 11,91,921 लोकांचं लसीकरण करण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण 6.27 कोटी डोस देण्यात आलेत. विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितलं की, शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 11,91,921 लस देण्यात आल्या. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत लसीकरण मोहीम सुरू आहे. अंतिम आकडा रविवारी येईल. भारतीयांनो, या देशात तुम्हांला Quarantine होण्याची गरज नाही विभागाच्या मते, लसीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत राज्य अजूनही अव्वल आहे. राज्यातील 1.71 कोटी लोकांनी दोन्ही डोस घेतल्याची नोंद आहे. राज्यातील कोरोना व्हायरसची सद्यस्थिती शनिवारी राज्यात कोरोना व्हायरसचे 4,130 नवीन रुग्ण सापडले आणि 64 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की राज्यातील एकूण रुग्णसंख्या 64,82,117 वर पोहोचली आहे तर मृतांची संख्या 1,37,707 वर गेली आहे. आज 2 हजरा 506 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 62,88,851 वर पोहोचली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Maharashtra News

    पुढील बातम्या