कीटकनाशकांबाबत सरकारचे नवे धोरण जाहीर

कीटकनाशकांबाबत सरकारचे नवे धोरण जाहीर

यामध्ये कीटकनाशक उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना अधिक कडक नियमांची चौकट घालून दिली आहे. मात्र राज्याच्या कृषी विभागावर प्रत्यक्ष शेतावर जाऊन संवाद आणि शेतकऱ्यांचे प्रशिक्षण याबाबत ठोस असे निर्देश नाहीत.

  • Share this:

10 ऑक्टोबर: यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकाच्या फवारणीत शेतकरी आणि मजुरांचा मृत्यू झाल्यावर राज्य सरकार खडबडून जागं झालं आहे. गेले काही दिवस बैठकांचे सत्र सुरू असून त्यातून सरकारने याबाबत धोरण ठरवले आहे.गेल्या महिन्याभरात तब्बल 40 शेतकरी आणि शेतमजुरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

यावर सरकारने धोरण आखले असून त्यासोबत काही निर्देशही दिले आहेत. यामध्ये कीटकनाशक उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना अधिक कडक नियमांची चौकट घालून दिली आहे. मात्र राज्याच्या कृषी विभागावर प्रत्यक्ष शेतावर जाऊन संवाद आणि शेतकऱ्यांचे प्रशिक्षण याबाबत ठोस असे निर्देश नाहीत. याआधी असलेल्या योजना आहेत. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. याबाबत सरकारी धोरणात ठोस उपाय अथवा आदेश दिले गेलेले नाहीत.

सरकारने कीटनाशकाबाबत ठरवलेले धोरण 

1. कीटकनाशकं विक्रेत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधावा तसंच वापराबाबत मार्गदर्शन करावं

2. ज्याभागात शिफारस आणि आवश्यकता नसताना अप्रमाणित कीटकनाशकांची विक्री केली जाते ती तातडीने बंद झाली पाहिजे.

3. वितरकाला आमिषे दाखवून चुकीची माहिती देऊन कीटकनाशक विक्रीस भाग पाडले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची हानी होते. कृषी सेवा केंद्र, कृषी विभागातील कर्मचारी यांच्या संगनमताने अप्रमाणीत कीटकनाशकांची विक्री केली जात असेल तर नुसता दंडात्मक नव्हे तर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

4.गरज नसताना ज्याभागात गरजेपेक्षा जास्त कीटकनाशकांची विक्री झाली त्याची आता चौकशी केली जाणार आहे. यापुढे विक्री आणि मागणी याबाबतचा आलेख तपासला जाईल.

5. औषध वापराने दुष्परिणामांची स्थिती निर्माण झाल्यास, कीटकनाशक उत्पादक कंपन्यांनी प्रशासन आणि आरोग्ययंत्रणेला विषबाधेवर प्रतिकारक औषधाबाबत माहिती द्यावी अशी अपेक्षा आहे.

6. बीटी बियाणे उत्पादक कंपन्यां प्रत्येक तालुक्यात बियाण्यांची माहिती, त्याचा वापर, किटकनाशकांची फवारणी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनिधी नेमणार होते मात्र अशा प्रकारची कुठलीही नियुक्ती बियाणे कंपन्यांकडून केली गेली नाही. हा नियम यापुढे काटेकोरपणे पाळावा लागणार आहे.

याशिवाय राज्य सरकारचे काही स्थायी निर्देश दिले आहेत-

1. कीटकनाशकांच्या किंमतीवरील नियंत्रणासाठी कायदा करणार

2. कीटकनाशक उत्पादक कंपन्यांच्या संघटनेने जाणीव जागृतीपर मेळावे आयोजित करावे

3. फवारणी करणाऱ्या मजुराची मोफत आरोग्य तपासणी करून त्याला सुरक्षा किट द्यावी व त्याबाबत त्याला मार्गदर्शन करावं

4. ग्रामपंचायत, पंचायत समिती येथे फलक लावून फवारणीबाबत जाणीवजागृती करावी

5. जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटून किटकनाशकात वापरलेल्या मोलिक्यूलबाबत माहिती द्यावी.

6. कंपन्यांनी राज्यभर जिल्हानिहाय जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं

First published: October 10, 2017, 8:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading