Elec-widget

उरण ONGC प्लांटमध्ये भीषण आग, दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू

उरण ONGC प्लांटमध्ये भीषण आग, दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील उरण येथील ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन(ONGC )प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 3 सप्टेंबर : रायगड जिल्ह्यातील उरण येथील ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन(ONGC )प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही आग भडकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून युद्धपातळीवर आग आटोक्यात आणण्याचं कार्य सुरू आहे. रौद्ररुप धारण केलेल्या आगीमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान 10 हून अधिक जण कोल्ड स्टोअरेजमध्ये अडकल्याची भीतीदेखील वर्तवण्यात येत आहे.

(वाचा : पत्नीच्या हौस पूर्ण करण्याच्या नादात पती लागला भीकेला, प्रकरण कोर्टात)

Loading...

(वाचा : काँग्रेसच्या माजी मंत्र्याची मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली, मुंबईत देणार धक्का?)

आगीचे मोठ-मोठे लोट पसरत असल्यानं शेजारील परिसर रिकामा करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. आगीची भीषणता लक्षात घेऊन प्रशासनाने परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर ओएनजीसीच्या या प्रकल्पासून एक किलोमीटरपर्यंत नागरिकांना प्रवेश बंद केला आहे.

(पाहा : SPECIAL REPORT: अब्दुल सत्तारांमुळे शिवसेनेचं बळ वाढणार?)

प्राथमिक माहितीनुसार, इंधन गळतीमुळे आग भडकल्याचं म्हटलं जात आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

VIDEO: उरणच्या ओएनजीसी प्लांटमध्ये भीषण अग्नितांडव! नागरिकांमध्ये भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: fire
First Published: Sep 3, 2019 09:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...