संक्रांतीला माहेरी न पाठवल्याने विवाहितेची आत्महत्या, 8 महिन्यांपूर्वी झाला विवाह

संक्रांतीला माहेरी न पाठवल्याने विवाहितेची आत्महत्या, 8 महिन्यांपूर्वी झाला विवाह

पूजाची पहिली संक्रांत असल्याने आपल्याला माहेरी पाठवावे असे ती सासरच्यांना सांगत होती. सासरी संक्रांत साजरी करण्याचा सासरच्यांचा आग्रह होता.

  • Share this:

बीड,13 जानेवारी: मकर संक्रांत सण दोन दिवसांवर आला तरी सासरच्या लोकांनी माहेरी न पाठवल्याच्या रागातून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पूजा विकास बिक्कड (25, रा. धानोरा रोड, बीड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पूजाचा 8 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पूजाने राहत्या घरी वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी पहाटे घडली.

मिळालेली माहिती अशी की, पूजा बिक्कड हिचा विवाह एप्रिल 2019 मध्ये विकासशी झाला होता. पूजाची पहिली संक्रांत असल्याने आपल्याला माहेरी पाठवावे असे ती सासरच्यांना सांगत होती. सासरी संक्रांत साजरी करण्याचा सासरच्यांचा आग्रह होता. यातून पूजा काही दिवसांपासून नाराज होती. रविवारी पहाटे पूजाने घरी वायरच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, मीना तुपे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पंचनाम्यासाठी आलेल्या पोलिसांचा उडाला गोंघळ...

जिल्हा रुग्णालयात मृतदेह सकाळी आणल्यानंतर कर्मचाऱ्याने शवविच्छेदन गृहात ठेवला व कुलूप लावून घेतले. पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे पंचनाम्यासाठी गेल्या असता खाेली बंद होती. सरकारी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शवविच्छेदनगृह उघडून देण्यास असमर्थता दर्शवली. यामुळे पोलिस पंचनाम्यासाठी ताटकळले होते.

कौटुंबीक वादातून विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

दुसरीकडे, तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे कौटुंबिक वादातून विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. चंदाराणी बाळासाहेब सदाकळे (वय 27), हिंदुराज बाळासाहेब सदाकळे (वय 7) आणि धनुष्य बाळासाहेब सदाकळे (वय 3) अशी त्यांची नावे आहेत. ही दुर्घटना रविवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. या घटनेची तासगाव पोलिसांत नोंद झाली असून तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण तासगाव पूर्वभागासह सावर्डे गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत घटनास्थळ व तासगाव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, चंदाराणी हिचा दहा वर्षांपूर्वी सावर्डे येथील बाळासाहेब सदाकळे याच्याशी विवाह झाला होता. बाळासाहेब हा काही काळ दुसऱयाच्या किराणा दुकानमध्ये कामास होता. सध्या त्याने गावात स्वतःची छोटीशी बेकरी सुरू केली आहे. जोडधंदा म्हणून एक ओमनी गाडीतून शाळेच्या मुलांना सोडण्याचे काम करीत आहे. त्यातूनच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललो.

बाळासाहेब व चंदाराणी यांचा संसार दहा वर्षांपासून आनंदाने सुरू होता. त्यांच्या संसाराच्या वेलीवर हर्षद उर्फ अभिराज (वय 9), हिंदुराज (वय 7) व धनुष्य (वय 3) ही तीन मुले जन्माला आली होती. हर्षद हा तिसरीमध्ये, हिंदुराज हा पहिलीत शिकत होता. तर धनुष्य हा अंगणवाडीत जात होता. किरकोळ कारणावरून पती-पत्नीत नेहमी भांडणे व्हायची. बुधवार, 8 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वा. त्यांच्या कौटुंबिक कारणातून वादावादी झाली. चंदाराणी रागाच्या भरात अभिराज व हिंदुराज या दोन मुलांना घेऊन घरातून निघून गेली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 09:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading