सचिन जिरे, (प्रतिनिधी)
औरंगाबाद, 15 जुलै- लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संजीवनी तेजस देशमुख (वय-22) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून संजीवनीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. फुलंब्री तालुक्यातील वदोड कान्होबा गावात ही घटना घटली आहे.
संजीवनीच्या नातेवाईकांनी घेतला हा पवित्रा..
सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून संजीवनीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा संजीवनीच्या नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या संजीवनीचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. हॉस्पिटलबाहेर मृताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याने परिसरात तणाव पसरला आहे.
57 मिनिटांचा VIDEO शूट करून तरुणाने केली आत्महत्या
युवकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटींग चालू करून गळफास घेतल्याची घटना न्यायनगर भागात (काल) शनिवारी दुपारी घडली होती. मुकेश सुधाकर साळवे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी मुकेशचा मोबाईल जप्त केला असून त्यामध्ये मुकेशने मृत्यूपूर्वी केलेले 57 मिनिटांचे शुटींग आढळून आलं आहे.
पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यायनगर भागात सुधाकर साळवे यांचे कुटुंब राहते. पती-पती मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करतात. त्यांची तिन्ही मुले वेगवेगळ्या ठिकाणी कामाला आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा मुकेश हा बीड बायपास भागात वॉशिंग सेंटरवर कामाला होता. संपूर्ण कुटुंब कामानिमित्त बाहेर गेलं असताना मुकेशला सुट्टी असल्याने तो घरीच होता. दुपारी 1 वाजेच्या सुमारास सुधाकर दुपारच्या जेवणासाठी घरी आले. त्यावेळी मुकेशने घराच्या छताच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.वडिलांनी तात्काळ घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुकेशला फासावरून उतरवून बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला दुपारी साडेतीन वाजता मृत घोषित केले.
VIDEO: औरंगाबादमध्ये खळबळ, पायात साखळी कुलूप बांधून फिरतेय महिला