Home /News /maharashtra /

महाडमध्ये इमारत दुर्घटनेबद्दल नवी माहिती, घटनेच्या काही तासांआधीचा PHOTO आला समोर

महाडमध्ये इमारत दुर्घटनेबद्दल नवी माहिती, घटनेच्या काही तासांआधीचा PHOTO आला समोर

रायगड जिल्ह्यातील महाड इथे तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.

    महाड, 25 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातील महाड इथे तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. परंतु, सोमवारी संध्याकाळी इमारत कोसळल्या या घटनेच्या काही तासांआधीचा एक फोटो समोर आला आहे. तारिक गार्डन इमारतीचा एका खांबाला तडे गेले होते. सकाळी 10 वाजता इमारतीचा एक खांब हा कोसळला होता. याची तक्रार रहिवाशांनी बिल्डराकडे केली होती. त्यानंतर बिल्डराने खांबाला प्लास्टर करून देतो असं सांगितलं होतं, असं इथल्या रहिवाशांनी सांगितले. पण जर बीम कोसळला हे बिल्डरच्या लक्षात आले होते, त्याने हे गंभीरपणे  घेतलं असते तर ही दुर्घटना घडली नसती, असा मुद्दा आता उपस्थितीत झाला आहे. दरम्यान, आज सकाळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी या घटनेच्या पाहणीसाठी जाणार आहे. तसंच या  घटनेची चौकशी करावी असे आदेश नगरपालिकेला दिली आहे. संबंधित इमारतीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कारवाई केली पाहिजे असं म्हटले आहे.  त्याचबरोबर या दुर्घटनेत  मृ्ताच्या नातेवाईकाला चार लाख रूपये तर जखमींना काही आर्थिक मदत करण्यात येईल, असंही वडेट्टीवार यांनी जाहीर केले. बिल्डरासह 5 जणांवर गुन्हा दाखल सोमवारी संध्याकाळी तारिक गार्डन ही 5 मजली इमारत  कोसळली होती. या दुर्घटनेत एका व्यक्तीला मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा मृतदेह ढिगाराखालून बाहेर काढला आहे. या दुर्घटनेप्रकरणी  5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बिल्डराचा समावेश आहे. या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत  तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि Rcc कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून किती खर्च झाला? धक्कादायक माहिती आली समोर दरम्यान, घटनास्थळी 12 तासांपासून पोलीस, एनडीआरएफच्या मदतीनं मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची माहिती मिळली होती. त्यानुसार मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ढिगाऱ्यात पहिला मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह गॅस कटरने स्लॅब कापून काढण्यात आला आहे.बचाव पथकाने जेसीबीच्या मदतीनं 8 जणांना ढिगाऱ्याखालून काढलं. जखमींना स्थानिक रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. या इमारतीमध्ये 43 कुटुंब राहात होती त्यापैकी 18 कुटुंबातील लोक कोरोनामुळे गावी गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या