देवळाली कॅम्पमध्ये हेरगिरी प्रकरणाची नवी माहिती समोर, पाकने तरुणाचा असा घेतला फायदा

देवळाली कॅम्पमध्ये हेरगिरी प्रकरणाची नवी माहिती समोर, पाकने तरुणाचा असा घेतला फायदा

3 ऑक्टोबर रोजी देवळाली कॅम्प परिसरातील आर्टिलरी सेंटरच्या सैनिकी हॉस्पिटलमध्ये एका रोजंदारीवरील कर्मचार्‍याने व्हॉट्स अ‍ॅपद्वारे हॉस्पिटलचे फोटो थेट पाकिस्तानला पाठवल्याचे उजेडात आले होते.

  • Share this:

नाशिक, 10 ऑक्टोबर : नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरातील आर्टिलरी सेंटरची हेरगिरी करण्याचा प्रकार उघड झाला होता. एका तरुणाने सैनिकी हॉस्पिटल परिसराचे फोटो व्हिडीओ पाकिस्तानमधील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पाठवेल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणी तरुणाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

दीपक शिरसाट याने गेल्या 13 महिन्यांपूर्वी  कंपनीचे काम ऐकण्यास नकार दिला. कंपनीने कारवाई केली म्हणून मग कंपनीतच आमरण उपोषण करायला बसला. नंतर कंपनीने बडतर्फ केले, कंपनीने बडतर्फ केले म्हणून या तरुणाने प्रचंड राग व्यक्त करत कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. गेल्या 13 महिन्यांपासून त्याचा पगार बंद होता. मात्र, तरीही HAL मध्ये काही परिसरापर्यंत त्याला प्रवेश होता. कदाचित हीच गोष्ट पाकिस्तानी लोकांकडून हेरली गेली आणि याच्या रागाचा उपयोग आपल्या फायद्या साठी करावा म्हणून याला गळाला लावले असल्याचा संशय आहे.

दीपक शिरसाटला अटक

पाकिस्तान येथील आयएसआय (ISI) या गुप्तहेर संघटनेस भारतीय बनावटीच्या विमानाची माहिती पुरवणाच्या संशयावरून एका कर्मचाऱ्याला दहशतवाद विरोधी पथकांनं (ATS) अटक केली आहे. दीपक शिरसाट असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचारी आहे. आरोपीनं आर्टलरी सेंटरमध्ये हेरगिरी करत ISIला फायटर एअर क्राफ्टसह गोपनीय जागांच्या छायाचित्रालह माहिती पाठवल्याचं समोर आलं आहे.

एक व्यक्ती परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्याच्याशी संबंधीत संवेदनशील माहिती तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती पुरवत असल्याची टीप नाशिक एटीएसला मिळाली होती. त्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 3 ऑक्टोबरला संशयित तरुणाला अटक

3 ऑक्टोबर रोजी देवळाली कॅम्प परिसरातील आर्टिलरी सेंटरच्या सैनिकी हॉस्पिटलमध्ये एका रोजंदारीवरील कर्मचार्‍याने व्हॉट्स अ‍ॅपद्वारे हॉस्पिटलचे फोटो थेट पाकिस्तानला पाठवल्याचे उजेडात आले होते. या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर  लष्करी जवानांनी या तरुणाची तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये लष्करी विभागातील फोटो पाकिस्तानातील मोबाईल व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवण्यात आल्याचे आढळुन आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत सुभेदार ओंकार नाथ यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. लष्करी अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी या व्यक्तीची सखोल चौकशी करत असुन, लष्करी विभागाचा फोटो पाकिस्तानी मोबाईल क्रमांकावर पाठवणे हा हेरगिरीचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंदी असतानाही मोबाईल वापर

लष्करी हद्दीत मोबाईल वापरण्यास बंदी आहे. तरीही मोबाईलचा वापर होत असल्याचे या घटनेतून पुढे आले आहे. अर्टलरी सेंटरमध्ये तोफ प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे लष्करी हद्दीतून पाकिस्तानात हेरगिरीचा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

2009 मध्येही झाली होती हेरगिरी

यापूर्वीदेखील नाशिकमध्ये 2009 सालात पोलीस प्रबोधिनीसह रेल्वेस्थानक, आर्टिलरी सेंटरसह गर्दीच्या ठिकाणी घातपाताचा कट रचल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी बिलाल शेख ऊर्फ लालबाबा याला सातपूरमधील शिवाजीनगर येथून अटक केली होती. मुंबईवरील 26/11 हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अतिरेकी अबू जुंदल याने मुंबईनंतर नाशिक हे अतिरेक्यांचे लक्ष्य होते, याची कबुली दिली होती.

Published by: sachin Salve
First published: October 10, 2020, 9:26 AM IST
Tags: nashik

ताज्या बातम्या