मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार, सावित्री नदीनं धोक्याची पातळी गाठली

रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार, सावित्री नदीनं धोक्याची पातळी गाठली

महाड शहराजवळील गांधारीफ नदीवरील पूल पाण्याखाली महाड रायगड रोड पण पाण्याखाली गेला आहे. महाड बाजारपेठ, भाजी मंडई, दस्तुरी भागात पाणी भरण्याची शक्यता आहे.बिरवाडी मच्छिमार्केटमध्ये पाणी शिरलं आहे.

  रायगड, 07 जुलै : रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काळ, सावित्री नदी धोक्याची पातळी गाठली असून महाड शहराजवळील गांधारीफ नदीवरील पूल पाण्याखाली महाड रायगड रोड पण पाण्याखाली गेला आहे. महाड बाजारपेठ, भाजी मंडई, दस्तुरी भागात पाणी भरण्याची शक्यता आहे.बिरवाडी मच्छिमार्केटमध्ये पाणी शिरलं आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व संबंधित विभाग प्रमुखांना दक्षता घेण्यास सूचित केले आहे. रायगडमध्ये महाड तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय.  काळनदी तुडुंब भरून वाहतेय. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीतील वाढ चांगली आहे. जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाची २८ धरणे आहेत. यातील ९ धरणे आत्ताच पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. तर इतर आठ धरणातही ७० टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे, ही एक समाधानाची बाब आहे.  फणसाड, सुतारवाडी,कवळे, उन्हेरे, पाभरे,संदेरी, खिंडवाडी, खैरे आणि भिलवले अशी पूण क्षमतेने भरलेल्या धरणांची नावे आहेत. तर वावा,कोंडगाव, कुडकी, वरंध,कोथुर्डे, कलोते मोकाशी,मोरबे, उसरण या धरणांमध्येही क्षमतेच्या ७० टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 तासापासून मुसळदार पाऊस सुरू आहे डहाणू ,तलासरी,विक्रमगड,जव्हार, वाडा तसेच मोखाडा तालुक्यात पावसाचा जोर सुरूच आहे तर डहाणू तालुक्यातील कासा परिसरात सखल भागात पाणी साचले आहे तर सुर्या  नदी व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हेही वाचा घरात जेवायला बोलावले, पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल ओतले FIFA WC 2018 : बेल्जियमकडून बलाढ्य ब्राझीलचा पराभव

  VIDEO : टॉयलेटला गेले अन् कमोडमध्ये बसले होते नागोबा !

    रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. दापोली, खेड, मंडणगड तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. हवामान खात्यानं आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. दोन दिवसांपूर्वीच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. जगबुडी नदीला तर पूर आला होता. सातारा-महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.गेल्या चार दिवसांपासून महाबळेश्वर ,कोयना भागात पावसाचा जोर वाढलाआहे.
  First published:

  Tags: Heavy Rain, Mahad, Ratnagiri, Savitri river, पाऊस, महाड, रत्नागिरी, सावित्री नदी

  पुढील बातम्या