शिर्डी, 30 जून- राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प 'मुंबई-नागपूर' समृद्धी महामार्गाने कोपरगाव तालुक्यातील एका शाळेचा बळी घेतला आहे. पन्नास वर्षांपासून सुरू असलेली चांदेकसारे गावातील हायस्कूलची इमारत रविवारी जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे 900 विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत.
समृद्धी महामार्गाने राज्य समृद्ध होणार असले तरी या महामार्गाने अनेक गावे, अनेक कुटूंब उद्धवस्त झाली आहेत. त्यातील एक असलेली कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील ही भारत सर्व संघाची न्यू इंग्लिश स्कूलही बळी ठरली आहे. शाळेच्या संचालकांनी कोर्टात धाव घेतलेली असताना पंधरा दिवसांपूर्वी शाळेला नोटीस देण्यात आली आणि आज तहसीलदार, पोलीस बंदोबस्तात शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.
गेल्या पन्नास वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करणाऱ्या या शाळेत आज जवळपास 900 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची इमारत पाडल्याने आता त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. एक महिन्याच्या आत पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे शाळेचे सचिव प्रकाश जाधव यांनी सांगितल आहे.
विद्युत वाहिनी अंगावर पडून तरुण शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू
विद्युत वाहिनी अंगावर पडल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे ही घटना घडली आहे. प्रवीण लक्ष्मण सुपेकर (वय-28) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी चार वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. शेतात काम करत असताना प्रवीणच्या अंगावर विजेची तार पडली. विजेच्या धक्क्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथे प्रवीण हा शेतात नांगरटीचे काम होता. प्रवीणच्या अंगावर विद्युत वाहक तार तुटून पडल्याने त्याचा जागीच मुत्यृ झाल्याची धक्कादायक घटना घडलीय तर त्याला सोडवण्यासाठी गेलेली त्याची चुलतीही यावेळी तारेला चिटकली होती मात्र जवळच असलेल्या पडली. प्रवीणचा जागेवर मृत्यू झाला. पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीज मंडळाने देखभाल करणे गरजेचे होते. अधिकाऱ्यांनी वेळीच काळजी घेतली असती तर तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला नसता.
अपघातात एक ठार.. दहा जखमी..
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात रविवारी दुपारी ॲपेरिक्षा आणि इंडीका गाडीचा भीषण अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत.
नेवासा-कुकाणा रस्त्यावरील सौंदाळा शिवारातील ही घटना घडली. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना ओरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
SPECIAL REPORT : 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट