आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेबाबत पंढरपुरातून नवी मागणी

आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेबाबत पंढरपुरातून नवी मागणी

पंढरपुरात आषाढी एकादशीला मुख्यमंत्रीदेखील सपत्निक विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करतात.

  • Share this:

पंढरपूर, 27 जून : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूर शहराबाहेरून येणाऱ्या विठ्ठला भक्तांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी वारकरी दाम्पत्याला दिला जाणारा आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान यंदा एखाद्या सफाई कर्मचारी दाम्पत्या देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक कृष्णा नाना वाघमारे यांनी केली आहे.

पंढरपुरात आषाढी एकादशीला मुख्यमंत्रीदेखील सपत्निक विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करतात. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील मंदिर समितीने शासकीय पूजेसाठी निमंत्रण दिलं आहे. तसंच समितीने त्यादृष्टीने नियोजनही सुरू केलं आहे. त्याचवेळी पंढरपूरमधून सफाई कर्मचारी दाम्तत्याला पूजेचा मान देण्याची मागणी समोर आली आहे.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता म्हणून 17 मार्चपासून श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या काळात देखील कोणाही भाविकास मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. यंदा वारकऱ्यांनी यात्रेसाठी पंढरपूरला येऊ नये अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे.

हेही वाचा - पुण्यासाठी अनलॉक ठरला घातक, 25 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या तिपटीने वाढली

यंदा कोणीही वारकरी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी येऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या वेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान कोणाला दिला जाणार याविषयी उत्सुकता आहे.

First published: June 27, 2020, 7:48 PM IST

ताज्या बातम्या