नागपूर, 24 डिसेंबर : कोरोनाचं नवं रूप समोर आल्यानंतर विदेशातच नाही तर भारतासाठी देखील मोठी चिंतेची बात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नागपुरातील एका तरुणाला या नव्या कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या तरुणाच्या शरीरात नवीन स्टेन असल्याचा अंदाज आहे. या तरुणाची चाचणी करून त्याचे नमुने पुण्यात पाठवण्यात आले आहेत.
पुण्यातील लॅबमधून येणाऱ्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण इंग्लंडहून आला होता. या तरुणावर सध्या नागपुरातील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर या तरुणाचे नमुने पुण्यातील NIV इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हा तरुण काही जणांच्या संपर्कात देखील आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तरुणाच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आलं असून इतर नागरिकांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे प्रशासन सतर्क झालं असून युद्धपातळीवर योजना राबवल्या जात आहेत.
हे वाचा-धक्कादायक! ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता
NIV चा अहवाल आल्यानंतर नेमकं या कोरोनाचं स्वरूप स्पष्ट होऊ शकणार आहे. मात्र तोपर्यंत ही धाकधाकू कायम आहे. याचं कारण म्हणजे इंग्लंडमध्ये नव्यानं रुप धारण केलेल्या कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले होते. या तरुणाला इंग्लंडची पार्श्वभूमी देखील आहे. त्यामुळे हा नवा कोरोना नागपुरात पोहोचल्याची काहीशी भीती देखील आहे मात्र अहवाल हाती आल्यानंतर या नेमकं स्वरूप स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या तरुणावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये हे कोरोनाचं रुप पसरत चाललं असून तिथे सरकारनं कडक लॉकडाऊन केला आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारची डोकेदुखी वाढली असून याच पार्श्वभूमीवर काळजी म्हणून ब्रिटेन आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New strain of virus in UK) आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही (Pune) विमान प्रवाशांना कोरोना टेस्टची (Corona Test) सक्ती करण्यात आली आहे.