खामगावहून चोरीला गेलेले बाळ दिल्लीत सापडले

खामगावहून चोरीला गेलेले बाळ दिल्लीत सापडले

हे बाळ घेऊन जातानाच सीसीटीव्हीत कैदही झालं होतं. पण आयबीएन लोकमतने या बातमीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं. त्यानंतर कारवाई करण्यात आली. 5 दिवसात पोलिसांनी या बाळाचा शोध लावला.

  • Share this:

बुलढाणा,01 ऑक्टोबर:  5 दिवसाचे चोरीला गेलेले बाळ शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. खामगावमधून चोरलेले हे बाळ पोलिसांना दिल्लीत सापडले आहे.

27 तारखेला खामगाव सामान्य रुग्णालयातून एका बुरखाधारी महिलेने हे बाळ चोरलं होतं. हे बाळ घेऊन जातानाच सीसीटीव्हीत कैदही झालं होतं. पण आयबीएन लोकमतने या बातमीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं. त्यानंतर कारवाई करण्यात आली. 5 दिवसात पोलिसांनी या बाळाचा शोध लावला. दिल्ली इथून या बाळाला हस्तगत करण्यात आलं आहे. तसंच चोरट्यांनाही अटक केली.  लवकरच संपूर्ण  प्रकार उघड होणार आहे. बुलढाण्याचे एसपी शशिकुमार पत्रकार परिषद घेणार आहेत

खामगाव येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी जिल्हाभरातील रुग्णांची मोठी गर्दी असते. ज्या महिलेचं बाळ चोरीला गेले होते ती महिला नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावावरून डिलिव्हरीसाठी येथे आली होती. 5 दिवसांपूर्वी या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.  ही महिला एका व्यक्तीसोबत एका 5 वर्षाच्या मुलीसोबत आली असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत होतं. अगोदर या महिलेने 3 ते 4 तास सर्व प्रसूती झालेल्या महिलांची रेकी केली व कोणाला मुलगा झाला कोणाला मुलगी झाली याची विचारणा सुद्धा अनेक महिलांना केली असल्याचं रुग्णालयातील महिलांनी सांगितलं. रात्री 3.45 वाजता या महिलेने या बाळाला एका पिशवीत टाकून पळ काढल्याचे समोर आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2017 03:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading