भयंकर! अवघ्या 13 दिवसांच्या चिमुरड्याला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारलं

भयंकर! अवघ्या 13 दिवसांच्या चिमुरड्याला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारलं

पाण्याच्या टाकीत 13 दिवसांच्या चिमुरड्याचा मृतदेह आढळून आल्यानं उडाली खळबळ

  • Share this:

सांगली, 4 नोव्हेंबर: घराच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत अवघ्या 13 दिवसांच्या चिमुरड्याचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सांगलीतील पलूस तालुक्यातील माळवाडी येथील पाटीलमळा या शेतवस्तीत ही संतापजनक घटना घडली आहे.

भिलवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मात्र, अद्याप हत्येचं कारण समजू शकलं नाही.

हेही वाचा...पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका

मिळालेली माहिती अशी की, माळवाडी-वसगडे रस्त्यालगत माळी यांचा शेतातील वस्तीवर साईदीप नावाचा बंगल्यात ही टना घडली. घरातील सगळे पुरुष सदस्य शेतात गेले होते. ऐश्वर्या अमित माळी ही आपल्या 13 दिवसांच्या चिमुरड्यासोबत बेडरूममध्ये झोपली होती. तर ऐश्वर्याची आई आणि वहिनी या दोघी शेतातील हौदावर धुणे धुत होत्या. ऐश्वर्या घराबाहेर असणाऱ्या बाथरूममध्ये गेली होती. ती परत बेडरुममध्ये आली तेव्हा खाटेवर बाळ गायब झालं होतं.

ऐश्वर्यानं बाळ सापडत नसल्यानं आईला सांगितलं. नंतर बाळाचा सगळीकडे शोध घेण्यात आला. परंतु बाळ कुठेही आढळून आलं नाही. घराच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीचं उघडून पाहिलं असता पाण्याच्या टाकीत बाळाचा मृतदेह तरंगत असल्याचं दिसून आलं. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत भिलवडी पोलिसांना माहिती देण्यात आली. भिलवडी पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले.

पीएम रिपोर्टची प्रतिक्षा...

पोलिसांनी 13 दिवसांच्या चिमुरड्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी चिमुरडा आणि त्याच्या आई-वडिलांबाबत चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर चिमुरड्याची हत्या नेमकं कशी झाली, हे समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा...विकृतीचा कळस! कुत्र्यावर बलात्कार; मुक्या जीवालाही हैवाणानं सोडलं नाही

तपास कार्यात सीसीटीव्हीची मदत

13 महिन्यांच्या चिमुरड्याच्या हत्येचा गुंता सोडवण्यासाठी पोलीस गाव आणि आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहेत. गावातील नागरिकांची कसून चौकशी सुरू आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 4, 2020, 9:32 PM IST

ताज्या बातम्या