धनश्रीच्या मृत्यूबाबत फरार डॉक्टरने व्हिडिओ क्लिपद्वारे मांडली बाजू.. केला धक्कादायक खुलासा

धनश्रीच्या मृत्यूबाबत फरार डॉक्टरने व्हिडिओ क्लिपद्वारे मांडली बाजू.. केला धक्कादायक खुलासा

दाताचे ऑपरेशन करताना पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धनश्री जाधव (वय-19) मृत तरुणीचे नाव आहे. अतिरक्तस्त्रावामुळे धनश्रीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. आता मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, (प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड, 5 मे- दाताचे ऑपरेशन करताना पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धनश्री जाधव (वय-19) मृत तरुणीचे नाव आहे. अतिरक्तस्त्रावामुळे धनश्रीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. आता मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

शस्त्रक्रियेदरम्यान धनश्रीची प्रकृती खालावली होती. तिचा बीपी 60 वर आला होता. तिच्यावर विविध चाचण्या घेण्यात आल्या. तशी कल्पना त्यांच्या नातेवाईकांना दिली होती, असे डॉ.पाटील यांनी सांगितले आहे. पण, तिचा ब्रेन डेड झाला होता. अशातच तिची मृत्यूशी झुंज संपली आणि शनिवारच्या सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. तसेच आपण सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यात तयार असल्याचेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, डॉ. पाटील दाम्पत्याचा हलगर्जीपणा धनश्रीच्या जीवावर बेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आता रुग्णालय प्रशासनाने तातडीने दंत चिकित्सालय सील केले. पाटील दाम्पत्याला हे चिकित्सालय भाडे तत्वावर वापरायला दिले होते. त्यामुळे आमचा आणि त्यांचा भाडे करार पलीकडे काही संबंध नसल्याचे म्हणत प्रशासनाने हात वर केले आहेत.

डॉक्टरने व्हिडिओ क्लिपद्वारे मांडली स्वतःची बाजू..

'news 18 लोकमत'ने धनश्री जाधवच्या मृत्यू बाबतचे वृत्त दाखवताच तिच्यावर उपचार करणारे डॉ. राम पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. एका व्हिडिओ क्लिपद्वारे त्यांनी स्वतःची बाजू मांडली आहे.

शस्त्रक्रियेदरम्यान धनश्रीची प्रकृती खालावली होती. तशी कल्पना त्यांच्या नातेवाईकांना दिली होती, असे डॉ.पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, आपण सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यात तयार असल्याचेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

धनश्रीच्या दातांमध्ये जन्मजात दोष ( Crouzon's syndrome)होता. त्यावर शस्त्रक्रिया करून तो दोष डॉक्टर दूर करणार होते. धनश्रीच्या बहिणीचा 1 जून रोजी विवाह आहे, यासाठी तिने पिंपरी चिंचवडच्या आयुर्वेद रुग्णालय, स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले होते. दन्त चिकित्सक डॉ. राम पाटील आणि डॉ. अनुजा पाटील हे दाम्पत्याने 23 एप्रिलला शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. दुपारी 12 वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया साधारण 4 ते 5 वाजेपर्यंत संपणे अपेक्षित होते. मात्र, बारा तास झाले तरी शस्त्रक्रिया सुरूच होती. दरम्यान तिच्या नाका-तोंडातून अतिरक्तस्राव सुरू झाला. दातांमधील दोष दूर करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेल्या धनश्रीसोबत पुढे काय घडणार होते, याची पुसटशी कल्पना तिच्या कुटुंबियांना नसावी. म्हणून ठणठणीत असणाऱ्या धनश्रीला बारा तासात आयसीयूत दाखल करण्याची वेळ आली. बघता बघता स्टर्लिंग हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात तिच्यावर उपचार ही सुरू झाले. तोपर्यंत तिचा बीपी 60 वर आला होता. तिच्यावर विविध चाचण्या घेण्यात आल्या. पण, तिचा ब्रेन डेड झाला होता. अशातच तिची मृत्यूशी झुंज संपली आणि शनिवारच्या सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला.

SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'

First published: May 5, 2019, 8:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading