सुप्रिया सुळेंच्या 'त्या' पोस्टमुळे नेटकरी भडकले; जातीचा उल्लेख करणं पडलं महागात

सुप्रिया सुळेंच्या 'त्या' पोस्टमुळे नेटकरी भडकले; जातीचा उल्लेख करणं पडलं महागात

सुप्रिया सुळे यांनी गणेशोत्सवानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावर नेटिझन्सने जोरदार टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 01 सप्टेंबर : गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. मात्र त्या फोटो वरील कमेंटमुळे त्यांच्यावर नेटिझन्सकडून टीका केली जात आहे. गणेशोत्सवानिमित्त ठाकरे आणि पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत. त्यांचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी 'माय सीकेपी मोमेंट पाटणकर सरदेसाई ठाकरे सुळे' अशी कमेंट केली आहे.

यावर नेटिझन्सनी जोरदार टीका केली आहे. लोकप्रतिनिधींनी जातीचा उल्लेख करणं कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अनेकांनी सुप्रिया सुळे यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. जाती-अंत हा केवळ भाषणांत पुरता आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सुप्रिया सुळे यांनी काढलेल्या सेल्फी मध्ये त्यांच्यासोबत पती सदानंद सुळे, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, वरूण सरदेसाई आणि आणि शौनक पाटणकर दिसत आहेत. सुप्रिया सुळेंच्या या पोस्टवर प्रितीश साठे म्हणतात, "विदर्भ पाण्याखाली असताना तुम्ही मराठा, सीकेपी, दलित, ब्राह्मण करत बसा. हे पुरोगामी महाराष्ट्रात कसे चालते?"

Published by: Priya Lad
First published: September 1, 2020, 11:15 PM IST

ताज्या बातम्या