Home /News /maharashtra /

ओह...भाई मौज कर दी! मामाला लावला लाखोंचा चुना, भाच्यानं 50 तोळे सोनं चोरून केली जिवाची मुंबई

ओह...भाई मौज कर दी! मामाला लावला लाखोंचा चुना, भाच्यानं 50 तोळे सोनं चोरून केली जिवाची मुंबई

Crime in Beed: मुंबई, पुण्यात जाऊन हौसमौज करण्यासाठी एका अल्पवयीन मुलानं आपल्या मामाच्या घरातील तब्बल 50 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे.

    बीड, 06 सप्टेंबर: मुंबई, पुण्यात जाऊन हौसमौज करण्यासाठी एका अल्पवयीन मुलानं आपल्या मामाच्या घरातील तब्बल 50 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीनं आपल्या अन्य काही मित्रांच्या मदतीनं घरातील तब्बल 50 तोळे दागिने चोरले होते. यानंतर हे दागिने सातही जणांनी आपसात वाटून घेत, मुंबई पुण्यात जाऊन मौज मजा केली आहे. पण एकाच दिवशी गावातील तिघे गायब झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अल्पवयीन भाच्याचा कांड उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सातही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली जात आहे. अल्पवयीन आरोपीचे मामा हे पुण्यात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्याचं घर बीडमध्ये आहे. मामाने बारावीत शिकणाऱ्या भाच्याला शिक्षणाच्या निमित्तानं आपल्या घरी ठेवलं होतं. दरम्यान भाच्याकडे समवयस्क मित्रांचं येण-जाणं वाढलं होतं. यातूनच घरातील 50 तोळे सोनं चोरून मुंबई पुण्यात हौसमौज करण्यासाठी जाण्याची भन्नाट कल्पना संबंधित सर्वांना सुचली होती. हेही वाचा-बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा, पाहा VIDEO त्यानुसार आरोपी भाच्यानं आपल्या अन्य सहा मित्रांच्या मदतीनं घरातील 50 तोळे सोन्यावर डल्ला मारला. यानंतर आरोपींनी हे दागिने  आपसात वाटून घेतले. तसेच 1 सप्टेंबर रोजी भाच्यासह तिघांनी पुणे, मुंबईला जाऊन आपले शौक पूर्ण केले आहेत. दरम्यान गावातील तिघे एकाच दिवशी गायब झाल्यानं नातेवाईकांची चौकशी सुरू करण्यात आली. तेव्हा भाच्यानं लिहून ठेवलेली एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत कोणाला किती दागिने दिले याचा तपशील लिहिला होता. हेही वाचा-चोरीसाठी विमानाने प्रवास, महागड्या हॉटेलात चैन; चौकशीदरम्यान पोलिसही हैराण त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानुसार पुणे, मुंबईला फिरायला गेलेल्या तीनही आरोपींना पोलिसांनी बीडमध्ये आणून सातही जणांची कसून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यातील एका आरोपीनं 65 हजारांचा महागडा मोबाइल फोन खरेदी केला होता. तर दुसऱ्यानं 14 तोळे सोनं एका खाजगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून लोन घेतलं होतं. तर एका पठ्ठ्यानं 10 तोळं सोनं एका सराफाला अवघ्या दीड लाखात विकलं होतं. या गुन्ह्यातील सातही आरोपी अल्पवयीन असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed, Crime news, Gold, Theft

    पुढील बातम्या