Home /News /maharashtra /

शिवसेना माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रात घुसून डॉक्टराला मारहाण

शिवसेना माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रात घुसून डॉक्टराला मारहाण

हा हल्ला माजी खासदार व त्यांचे पती रमेश नरहिरे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप डॉक्टर अभिजीत लोंढे यांनी केला आहे.

उस्मानाबाद, 12 जून : कोरोना (Corona) परिस्थितीशी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून कर्तव्य पार पाडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) एकीकडे डॉक्टरांशी संवाद साधून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चर्चा करत आहे. तर दुसरीकडे, उस्मानाबादेत शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याने लसीकरण केंद्रात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील कळंब शहरातील लोंढे हॉस्पिटलमध्ये (Londhe Hospital) ही घटना घडली आहे. शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे (Former MP Kalpana Narhire) यांच्या पुतण्याने  डॉक्टरांना मारहाण केल्याचे कृत्य घडले आहे. डॉ. अभिजित लोंढे यांच्यावर हल्ला करणारा बालाजी नरहिरे यांना पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. जमिनीसाठी इमानाशी बेईमानी, कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यासह एका अटक कळंब शहरातील लसीकरण केंद्र हे डॉ.अभिजित लोंढे यांच्या हॉस्पिटलमध्ये असून त्यांच्या समोरच्या बाजूला शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांचे घर आहे. लोंढे हॉस्पिटलमध्ये लसीकरणाला सुरू आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेली लोक गाड्या पार्क करत असतात. गाड्या पार्क करण्याच्या मुद्यावरूनच लोंढे आणि बालाजी नरहिरे यांच्यात वाद झाला होता. या वादातून बालाजी नरहिरे यांनी  डॉक्टर अभिजीत लोंढे यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत त्यांच्या मानेला जखम झाली आहे. दिलासा! ESICची महत्त्वाची स्कीम, कोविडमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळेल पगार हा हल्ला माजी खासदार व त्यांचे पती रमेश नरहिरे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप डॉक्टर अभिजीत लोंढे यांनी केला आहे. अभिजीत लोंढे यांच्यावर हल्ला झाल्यामुळे घटनेचा निषेध म्हणून शहरातील सर्व रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तासाभरापासून लसीकरण केंद्रही बंद आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बालाजी नरहिरेला ताब्यात घेतले आहे. पण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कामकाज सुरू करणार नसल्याचा डॉक्टरांनी इशारा दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Osmanabad, उस्मानाबाद

पुढील बातम्या