Home /News /maharashtra /

ठाणे: जिवंत महिलेच्या किडनीचा केला सौदा, नेपाळच्या गायिकेनं घातला कोट्यवधींचा गंडा

ठाणे: जिवंत महिलेच्या किडनीचा केला सौदा, नेपाळच्या गायिकेनं घातला कोट्यवधींचा गंडा

Crime in Thane: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील एका महिलेसोबत विचित्र घटना घडली आहे. संबंधित महिलेला किडनीच्या मोबदल्यात चार कोटी रुपये देण्याचं आमिष दाखवून तिची लाखोंची फसवणूक (Money Fraud) केली आहे.

    अंबरनाथ, 21 जानेवारी: ठाणे (Thane) जिल्ह्यातील अंबरनाथमधील (Ambernath) एका महिलेसोबत विचित्र घटना घडली आहे. संबंधित महिलेला किडनीच्या मोबदल्यात चार कोटी रुपये (Deal kidney in 4 crore) देण्याचं आमिष दाखवून तिची लाखोंची फसवणूक (Money fraud) केली आहे. आरोपी महिला ही दुसरी तिसरी कोणी नसून नेपाळमधील एक गायिका आहे. तिने अशाच प्रकारे आमिष दाखवून देशातून अनेकांची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी आरोपींकडून लेखी हमीपत्र लिहून घेतल्यानंतर, त्यांना सोडून दिलं आहे. कल्पना मगर असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे, त्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील रहिवासी आहेत. तर रबीना बाबी असं फसवणूक करणाऱ्या महिलेचं नाव असून ती नेपाळची गायिका आहे. पण सध्या तिचं वास्तव्य दिल्लीत आहे. आरोपी रबीना हिने काही दिवसांपूर्वी फिर्यादी कल्पना यांना किडनीच्या मोबदल्यात भरपूर पैसे मिळतील असं आमिष दाखवलं होतं. तिने पीडित महिलेच्या किडनीसाठी चार कोटी रुपये मिळतीलं असं सांगितलं होती. एवढे जास्त पैसे मिळतील या आशेनं कल्पना आपली किडनी देण्यासाठी तयार झाल्या होत्या. हेही वाचा-भरपूर शिकला पण वाया गेला; कौमार्यभंगाच्या कारणातून पुण्यातील तरुणीचा अमेरिकेत छळ त्यानंतर आरोपी रबीना हिने नोंदणी आणि इतर कामकाजाच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने आठ लाख रुपये वसूल केले होते. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, कल्पना यांनी सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने दिल्ली गाठली. याठिकाणी गेल्यानंतर कल्पना यांनी रबीनाने ज्या बँक खात्यात पैसे जमा करायला सांगितले होते, तो बँक खातेधारक आणि रबीना यांचा साथीदार अरविंद कुमार याची माहिती काढली. यावेळी संबंधितांच्या बँक खात्यात  देशभरातून साडेसहा कोटी रुपये जमा झाल्याचं उघड झालं. आरोपींनी अशाच प्रकारे देशभरातील इतर अनेकांनी देखील फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा-झोपेतच केला घात; पत्नीने अपंग पतीला दिला भयंकर मृत्यू,कोल्हापुरला हादरवणारी घटना या प्रकरणी पीडित महिलेनं अंबरनाथ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पण पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. तर दुसरीकडे दिल्लीतील शालीमार पोलिसांना याबाबत माहिती दिली असता, दिल्ली पोलिसांनी आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून 'फिर्यादीचे पैसे परत द्यावेत' असं लेखी हमीपत्र लिहून घेतलं आहे. हमीपत्र लिहून घेतल्यानंतर देखील आरोपींनी फिर्यादीचे पैसे परत केले नाहीत. आरोपी सध्या मोकाट असून ते देश सोडून जाण्याची भीती फिर्यादीकडून व्यक्त केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Thane

    पुढील बातम्या