मुलाला चिडवले म्हणून शेजाऱ्याने डोक्यात घातला बांबू, तक्रारीने पोलीसही झाले हैराण

मुलाला चिडवले म्हणून शेजाऱ्याने डोक्यात घातला बांबू, तक्रारीने पोलीसही झाले हैराण

एका क्षुल्लक कारणावरून घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे पिंपरी पोलिसांनी डोक्याला हात लावून घेतला.

  • Share this:

पिंपरी, 02 जून : 'पुणे तिथे काय उणे' असं उगाच म्हटलं जात नाही.  एका क्षुल्लक कारणावरून घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे पिंपरी पोलिसांनी डोक्याला हात लावून घेतला.  शेजारी राहणाऱ्या लहान मुलाला उपहासाने हागऱ्या म्हटल्याने झालेल्या  किरकोळ  वादाच रूपांतर भांडणात आणि नंतर बेदम मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली.

या घटनेत लहान मुलगा जखमी झाला असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी पुरूषोत्तम चाटे यांनी दिलेल्या माहिती नुसार, पिंपरी शहरातील कैलास नगर परिसरात  राहणाऱ्या राणी प्रकाश पाटील या आपल्या कुटुंबीयांसोबत जेवत होत्या. जेवण सुरू असताना अचानक मुलाला शौचास जायचे होते. जेवत असताना मुलाने शौचास जाण्याचे सांगितल्यामुळे वडिलांनी मुलाला हागऱ्या म्हणून चिडवले.

हेही वाचा -गावचे सरपंच आहे भारी, कोरोना आला नाही दारी, महाराष्ट्रातील एकमेव असे गाव!

मुलाला चिडवल्यामुळे शेजारीच राहणाऱ्या महिलेला याबद्दल राग आला आणि  त्यांनी आरोपी तुषार भंडारी याला फोन करून तुला हागऱ्या म्हटल्याचे सांगितले. बस्स या गैरसमजामुळे होत्याचं नव्हतं झालं.  त्यानंतर तुषार भंडारी याने घरी पोहोचून समोरील राहणाऱ्या कुटुंबासोबत वाद घातला. वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. आरोपी तुषार याने राणी पाटील यांच्या पतीला बेदम मारहाण केली.  दोन्ही कुटुंबातील वादामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

दोघांचे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी महिला गेली असता आरोपीने तिलाही मारहाण केली. यावेळी आरोपीने दगड फेकून मारला असता तो चुकून मुलाला लागला. यात तो दुखापतग्रस्त झाला. आरोपीने  फिर्यादी महिलेच्या पतीच्या डोक्यातही लाकडी बाबूने मारहाण केली. यामुळे मुलगा आणि पती जखमी झाले आहे.

हेही वाचा -पुणेकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, नव्या नियमावलीची आज होणार घोषणा

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. राणी पाटील यांनी मुलाला दगड का मारले असा जाब विचारला असता कविता पाटील (वय 44) आणि रिया नावाने महिलेनं त्यांनाही मारहाण केली.

या प्रकरणी पिंपरी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनंतर अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. या प्रकरणी पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 2, 2020, 11:40 AM IST

ताज्या बातम्या