Home /News /maharashtra /

धक्कादायक! पेस्ट कंट्रोलनंतर केलं दुर्लक्ष, पुण्यातील दाम्पत्याचा मृत्यू

धक्कादायक! पेस्ट कंट्रोलनंतर केलं दुर्लक्ष, पुण्यातील दाम्पत्याचा मृत्यू

पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तीने जी काळजी घ्यायला सांगितली होती ती त्यांनी घेतली नाही

    पुणे, 13 फेब्रुवारी : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर काळजी न घेतल्याने एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. बिबडेवाडी येथील गणेश विहार सोसायटीत हा प्रकार घडला आहे. अविनाश सदाशिव मजली (वय 64) आणि अपर्णा अविनाश मजली (वय 54) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत. घराच्या स्वच्छतेसाठी वेळोवेळी पेस्ट कंट्रोल केलं जातं. मात्र अनेकदा यानंतर योग्य ती काळजी घेतली जात आहे. पेस्ट कंट्रोल कंपन्यादेखील घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर जास्तीत जास्त वेळ बाहेर थांबण्याचा सल्ला देतात. मंगळवारी सकाळी मजली कुटुंबीयांनी घरात पेस्ट कंट्रोल केलं होतं. अशावेळी घरात थांबणे शक्य नसल्याने ते दोघेही भावाच्या घरी राहायला गेले. घरात पेस्ट कंट्रोल केल्यानं तुझ्याकडे काही तास राहायला आल्याचं त्यांनी आपल्या भावाला सांगितलं. काही तासांनी ते घरा गेले. मात्र, पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तीने जी काळजी घ्यायला सांगितली होती, ती त्यांनी घेतली नाही. घरी आल्यानंतर ते विषारी द्रव्य बराच काळ हवेत असतं. त्यामुळे दारं व खिडक्या उघड्या ठेवणं आवश्यक आहे. मात्र मजली कुटुंबीयांनी दारं, खिडक्या बंद करुन टीव्ही पाहत बसले. त्यामुळं काही वेळानं दोघेही घरात चक्कर येऊन पडले.  नंतर त्यांच्या मुलीला हे समजल्याने तिने दोघांना सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आलं. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास दोघेही पुन्हा स्वतःच्या घरी परतले. घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर कोणतीही काळजी न घेतल्याने दाम्पत्याचा मृत्यू बिबवेवाडी येथील गणेश विहार सोसायटीत घडला प्रकार
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: #Pune

    पुढील बातम्या