मुंबई, 30 डिसेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या धीरगंभीर स्वभावासाठी ओळखले जातात. बोलण्यातील जरब आणि रोखठोक स्वभाव यामुळे जवळचे कार्यकर्तेही त्यांच्यापासून दचकूनच असतात. अजित पवार यांची हास्यमुद्रा पाहायला मिळणं तसं दुर्मिळच. मात्र एका कौटुंबिक सोहळ्यात अजित पवार हे खळकळून हसताना पाहायला मिळाले.
पवार कुटुंबियातील अजित पवार यांच्या लहान भगिनी नीताताई यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त पवार कुटुंबियांकडून एक मधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट'च्या प्रमुख आणि आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार ,रणजित पवार व पवार कुटुंबीयांनी एकत्र येत गाणं म्हटलं.
या सगळ्या वातावरणात अजित पवार हेही चांगलेच खुललेले पाहायला मिळाले आणि त्यांनी पत्नी सुनेत्रा यांच्या गाण्यालाही चांगलीच दाद दिली. सोशल मीडियावर हा संपूर्ण व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.