नीता अंबानी साईंबाबांच्या चरणी..टीमच्या विजयाचा निरोप येताच घेतले साईंचे मुखदर्शन

नीता अंबानी साईंबाबांच्या चरणी..टीमच्या विजयाचा निरोप येताच घेतले साईंचे मुखदर्शन

नीता यांनी मुंबई इंडियन्सचा कलर असलेली निळ्या रंगाची शाल साईसमाधीवर चढवली. साईसमाधीवर डोकं टेकवून प्रार्थना केली. जोपर्यंत सामना सुरू होता तो पर्यंत नीता अंबानी साईमंदिर परिसरातच थांबून होत्या. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात केली.

  • Share this:

शिर्डी, १९ एप्रिल- दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर गुरुवारी रात्री मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटलमध्ये आयपीएल सामना सुरू असताना नीता अंबानी यांनी शिर्डीच्या साईंना टीमच्या यशासाठी साकडं घालतं. नीता यांनी मुंबई इंडियन्सचा कलर असलेली निळ्या रंगाची शाल साईसमाधीवर चढवली. साईसमाधीवर डोकं टेकवून प्रार्थना केली. जोपर्यंत सामना सुरू होता तो पर्यंत नीता अंबानी साईमंदिर परिसरातच थांबून होत्या. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात केली.

मुंबई इंडियन्स जिंकावा म्हणून नीता अंबानी या साईमंदिरात ठाण मांडून होत्या. रात्रीच्या शेजारतीलाही नीता अंबानी उपस्थित होत्या. नीता या मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीन आहेत.

टीमच्या विजयाचा निरोप येताच पुन्हा घेतले साईबाबांचे मुखदर्शन

नीता यांनी साईसमाधीवर मुंबई इंडियन्सचा रंग असलेली निळी शाल चढवली. मुंबई इंडियन्सच्या विजयाचा निरोप आल्यानंतर नीता यांनी पुन्हा साईबाबांचे मुखदर्शन घेतले. त्यानंतरच त्यांनी साईमंदिर परिसर सोडला.

नीता यांनी शुक्रवारी सकाळीही साईदर्शन घेतले. मुलगा अनंत याचा गुरुवारी आणि आज पती मुकेश यांचा वाढदिवस असल्याने नीता यांनी साईबाबांचे दर्शन घेऊन प्रार्थना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेमंत करकरेंबद्दल साध्वींचे धक्कादायक वक्तव्य, 'त्यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सूतक संपवलं' पाहा VIDEO

First published: April 19, 2019, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading