अलिबाग, 8 मार्च : पंजाब नॅशनल बँकेत जवळपास 13 हजार कोटींचा घोटाळा करून नीरव मोदीने भारतातून फरार झाला. आता नीरव मोदीला महाराष्ट्र सरकारकडून धक्का देण्यात आला आहे. अलिबागमधील नीरव मोदीचा तब्बल 100 कोटींचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. हा बंगला पाडण्यासाठी बंगल्यामध्ये 100 डायनामाइट लावण्यात आले.