इंदापूरनजीक निरा-भीमा स्थिरीकरण बोगद्यात लिफ्ट कोसळून 8 मजूर जागीच ठार

इंदापूरनजीक निरा-भीमा स्थिरीकरण बोगद्यात लिफ्ट कोसळून 8 मजूर जागीच ठार

निरा-भीमा स्थिरीकरण योजनेंतर्गंत इंदापूर परिसरात सुरू असलेल्या नद्याजोड प्रकल्पातील बोगद्यात लिफ्ट क्रेनचा वायररोप तुटून झालेल्या दुर्घटनेत 8 कामगारांचा जागीच मूत्यू झालाय. अकोले गावाच्या शिवारात संध्याकाळी पावणेसहाच्या सुमाराला ही दूर्घटना घडलीय.

  • Share this:

मधुकर गलांडे, प्रतिनिधी,

20 नोव्हेंबर, इंदापूर : निरा-भीमा स्थिरीकरण योजनेंतर्गंत इंदापूर परिसरात सुरू असलेल्या नद्याजोड प्रकल्पातील बोगद्यात लिफ्ट क्रेनचा वायररोप तुटून झालेल्या दुर्घटनेत 8 कामगारांचा जागीच मूत्यू झालाय. अकोले गावाच्या शिवारात संध्याकाळी पावणेसहाच्या सुमाराला ही दुर्घटना घडलीय. बोगद्यातील मजूर दिवसभराचं काम संपवून लिफ्ट क्रेनद्वारे बोगद्यातून वर येत असतानाच अचानक तिचा वायर रोप तुटला आणि निम्म्यावर आलेली क्रेन थेट 150 ते 200 फूट खोल बोगल्यात कोसळली. त्यात 8 मजूर जागीच ठार झालेत. सायंकाळी 7 पर्यंत 6 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय. बोगद्यात 300 मजूर काम करत होते. मृतांच्या वारसांना तातडीची मदत म्हणून सरकारने प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्याची घोषणा केलीय.

निरा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत तावशी ते डाळज बोगद्याचे काम सुरू आहे. आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास बोगद्यातील काम उरकून 8 परप्रांतीय कामगार क्रेनमध्ये वर येत होते. यावेळी क्रेन निम्म्यापर्यंत आल्यावर वायररोप तुटला. त्यामुळे हे कामगार तब्बल 150 ते 200 फूट खोल बोगद्यात कोसळले. त्यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. उत्तरप्रदेश, ओडिसा, आंधप्रदेश येथील हे कामगार आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना झाले. या दूर्घटनेमुळे बोगद्यातील इतर कामगारांमध्ये प्रचंड घबराट पसरलीय. अकोले परिसरातील या प्रकल्पाच्या शाफ्ट नं. ५ येथे ही दूर्घटना घडलीय.

मराठवाड्याला २५ टिएमसी पाणी कृष्णा व निरा नदीतून वाहून नेण्यासाठी राज्य सरकार निरा-भिमा जलस्थिरीकरणाचा बोगदा बांधत आहे. याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. या बोगद्याच्या खोदकामात 300 मजूर काम करीत आहेत.

 

First published: November 20, 2017, 8:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading