मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...तर कर्नाटकची विधानसभाच बरखास्त केली असती, बोम्मईंची भाषा पाकिस्तानची,' ठाकरे गटाचा पुन्हा हल्ला

'...तर कर्नाटकची विधानसभाच बरखास्त केली असती, बोम्मईंची भाषा पाकिस्तानची,' ठाकरे गटाचा पुन्हा हल्ला

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी बोम्मई यांच्या दाव्याचा चांगलाच समाचार घतेला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला आहे. महाराष्ट्र सरकारने जत तालुक्यातील या गावांच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करावा असं बोम्मई यांनी म्हटलं आहे. बोम्मई यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.  माझ्या हाती असतं तर कर्नाटकची विधानसभा बरखास्त केली असती असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

नीलम गोऱ्हे आक्रमक 

नीलम गोऱ्हे या बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावर आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी संताप व्यक्त केला आहे.  माझ्या हाती असतं तर कर्नाटकची विधानसभा बरखास्त केली असती.  कर्नाटक पाकिस्तानची भाषा बोलत आहे. वातावरण निर्मीती करून कोर्टात याचिका दाखल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे  केंद्र सरकार महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यातील मत मिळावी म्हणून या वादाला खेळवत ठेवत असल्याचा गंभीर आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.

संजय राऊतांचा निशाणा 

तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यपालांकडून झालेल्या शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे टाकण्यासाठी हा मुद्दा भाजप पुढे आणत आहे. देशातील कोणतेही भाजप पक्षाचे मुख्यमंत्री असं बोलत नाहीत. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. मात्र, लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ही स्क्रिप्ट दिली गेली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

बोम्मई नेमंक काय म्हणाले होते? 

बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला आहे.  महाराष्ट्र सरकारने जत तालुक्यातील या गावांच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करावा असं बोम्मई यांनी म्हटलं आहे. बोम्मई यांच्या या वक्तव्यावरू आता राजकारण पेटलं आहे.

First published:

Tags: Shiv sena, Uddhav Thackeray