मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला काय मिळालं? 'ही' आहे संपूर्ण यादी

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला काय मिळालं? 'ही' आहे संपूर्ण यादी

शिवसेनेकडे अवजड उद्योग मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मे रोजी आपल्या 57 मंत्र्यांना शपथ दिली. त्यानंतर सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते कुणाला कोणतं पद मिळणार याकडे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 7 जण आहेत. दरम्यान, मोदींनी जाहीर केलेल्या खाते वाटपामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे परिवहन मंत्रालय, प्रकाश जावडेकर -पर्यावरण मंत्री, अरविंद सावंत - अवजड उद्योग मंत्री, पियुष गोयल – रेल्वे मंत्री, संजय धोत्रे - मनुष्यबळ राज्यमंत्री, रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्राहक मंत्रालय राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शिवसेनेकडे अवजड उद्योग मंत्रालय कायम

2014मध्ये देखील शिवसेनेकडे अवजड उद्योग मंत्रालय होते. त्यावेळी अनंत गीते हे केंद्रात शिवसेनेचे मंत्री होती. पण, अनंत गीते यांना रायगडमधून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता अरविंद सावंत यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2019मध्ये शिवसेनेला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष होतं. पण, यावेळी देखील अवजड उद्योग मंत्रालय शिवसेनेकडे कायम ठेवण्यात आलं.

राज्यात शिवसेना – भाजप एकत्र लढल्यानं दोन्ही पक्षांना त्याचा फायदा झाला. शिवाय, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेला केंद्रात महत्त्वाचं पद दिलं जाण्याची चर्चा होती. पण, 2014 प्रमाणे 2019मध्ये देखील शिवसेनेकडे अवजड उद्योग मंत्रालय कायम ठेवण्यात आलं.

VIDEO : प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेणार? काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

First published: May 31, 2019, 1:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading