Home /News /maharashtra /

गडचिरोलीत दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी

गडचिरोलीत दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी

दुसऱ्या टप्प्यात 350 ग्राम पंचायतीसाठी तब्बल 80 टक्के मतदान झाले होते. आज सकाळी 8 वाजता संपूर्ण सुरक्षेत मतमोजणीला सुरुवात झाली

    गडचिरोली, 22 जानेवारी : राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (gram panchayat election result 2021 ) जाहीर झाला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील गडचिरोली जिल्ह्यातील 350 ग्राम पंचायतीची मतमोजणी सुरू आहे. निकालाचा पहिला कल हाती आला असून  विठ्ठलराव पेठा ग्राम पंचायतीवर   राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. माओवादीग्रस्त असलेल्या गडचिरोली भागात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. दुसऱ्या टप्प्यात 350 ग्राम पंचायतीसाठी तब्बल 80 टक्के मतदान झाले होते. आज सकाळी 8 वाजता संपूर्ण सुरक्षेत मतमोजणीला सुरुवात झाली. गडचिरोलीतील विठ्ठलराव पेठा ग्राम पंचायतीचा पहिला निकाल हाती आला आहे. या ग्रामपंचायतीवर  राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. तर देसाईगंज तालुक्यात आमगाव ग्राम पंचायतीमध्ये शिवसेनेनं बाजी मारली आहे. शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहे. त्यापाठोपाठ सिरोंचा तालुक्यात मोयाबीनपेठा आणि नरसिंहापल्ली ग्राम पंचायतमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना (आविस) ने विजय मिळवला आहे. आविसाने परसेवाडा ग्राम पंचायत, गर्कपेठा ग्राम पंचायत आणि वेंकटापुर ग्राम पंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. दरम्यान, ग्राम पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहण्यास मिळाली. भाजपच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त गावात भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा सर्वात जास्त ग्रामपंचायतीवर आम्हीच बाजी मारली असल्याचा दावा केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Gadchiroli, Gram panchayat

    पुढील बातम्या