Home /News /maharashtra /

BREAKING : राष्ट्रवादी पुन्हा! सुप्रिया सुळे ठरल्या लोकसभेत नंबर वन खासदार

BREAKING : राष्ट्रवादी पुन्हा! सुप्रिया सुळे ठरल्या लोकसभेत नंबर वन खासदार

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

बारामती, 02 जानेवारी : राष्ट्रवादीचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे (ncp mp supriya sule) यांनी पुन्हा एकदा नंबर वनचा किताब पटकावला आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची नाव जाहीर झाली असून सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या आहेत. (Supriya Sule becomes number one MP in Lok Sabha) नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.   विद्यमान 17 व्या लोकसभेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या आहेत. संसदेतील खासदारांच्या कामगिरीच्या आधारावर 'पीआरएस' या संस्थेने खासदारांच्या कामगिरीची यादी जाहीर केली आहे. पीआरएस संस्थेनं केलेल्या सर्व्हेनुसार, लोकसभा अधिवेशनामध्ये खासदार किती वेळा उपस्थितीत राहिले. किती प्रश्न विचारले, चर्चेंमध्ये सहभाग खासगी विधेयके आदींचा यात प्रकर्षाने उल्लेख करण्यात आला आहे. (सांगलीत जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा, पडळकरांचं थेट डायरीतून नाव वगळलं) यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक प्रश्न उपस्थितीत केले. अनेक चर्चांमध्ये त्या सहभागी झाल्यात. त्यामुळे त्या अव्वल ठरल्या आहे. 17 व्या लोकसभेत 92 टक्के सुप्रिया सुळे उपस्थितीत होत्या. तर  १५९ चर्चासत्रात त्या सहभागी झाल्यात. तर ३८३ प्रश्न उपस्थितीत केली. तसंच, 7 खाजगी विधेयक त्यांनी मांडली. 'बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सहयोगी पक्ष आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्या सर्वांच्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असून यातूनच आपल्याला महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विविध मुद्दे संसदेत मांडण्यासाठी ऊर्जा मिळते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांचे आभार मानले. (सेंच्युरियनमध्ये धक्का, जोहान्सबर्ग टेस्टआधी द्रविडची टीम इंडियाला तंबी!) याआधीही जून 2020 मध्ये लोकसभेत सर्वात जास्त प्रश्न विचारण्याचा बहुमान सुप्रिया सुळे यांनीच पटकावला होता.  सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले होते. तर सुळे यांच्यापाठोपाठ सुभाष भामरे (धुळे), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) यांचाही महाराष्ट्रातून टॉप 5 खासदारांमध्ये समावेश होता.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या