मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेलमध्ये जाणार, सेना नेत्याचं मोठं वक्तव्य

17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेलमध्ये जाणार, सेना नेत्याचं मोठं वक्तव्य

'शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका आघाडीचा धर्म पाळा'

बीड, 29 मार्च : बीडमध्ये (beed) गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीमध्ये (ncp) संघर्ष पेटला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (chandrakant khire) यांनीही 'शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका आघाडीचा धर्म पाळा. टक्केवारी घेणं आणि 17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेल मध्ये जाणार  आहे' असा इशाराच त्यांनी दिला आहे. बीडमध्ये आयोजित शिवसेना प्रवेशाच्या जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवरच जोरदार हल्लाबोल केला. याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उपस्थिती होती. (पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळण्यासाठी करा 'हे' काम, अन्यथा होईल पश्चाताप) महाआघाडीच्या इतर नेत्यांना इशारा देत आपण आघाडीमध्ये आहोत आपापसात मतभेद करायचे नाहीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही. महाविकास आघाडीत आम्ही देखील आहोत, त्यामुळे कुठलाही शिवसैनिकावरील अन्याय सहन केला जाणार नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी बजावून सांगितलं. 'मी आघाडीच्या नेत्यांना ही सांगू इच्छितो आपण आघाडी मध्ये आहोत, आपलामध्ये मतभेद करायचे नाहीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही आपण सगळे एक आहोत आपण एका कुटुंबातील आहोत उद्धवजी आपले  प्रमुख आहेत अजितदादा प्रमुख आहेत. नेहमी गुंगीत असणारे त्यांनी समजुन घ्यावं' असं म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वरती विकास तर सोडले कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत लक्षवेधी मांडणारे स्वतः कायदा किती पाळतात, ते आम्हाला माहीत आहेत' अशी टीकाही खैरेंनी केली. (Crime News: स्वतःच्या घराजवळ बसलेल्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या) बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हे अधिकाऱ्यांना शिव्या देत आहेत. एकही अधिकारी यापुढे आमदाराचे काम ऐकणार नाही. लिहून घ्या, मी विभागीय आयुक्तांना सांगणार आहे. दिवसभर गुंगीत असणारा माणूस लोकांना शिव्या देतो त्या माणसाला जागा दाखवा, असंही खैरे म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Beed, Beed news, बातम्या, बीड

पुढील बातम्या