राष्ट्रवादीची अडचण, शरद पवारांच्या कट्टर समर्थकाचा मुलगा करणार शिवसेनेत प्रवेश

सुरेश देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 12:14 PM IST

राष्ट्रवादीची अडचण, शरद पवारांच्या कट्टर समर्थकाचा मुलगा करणार शिवसेनेत प्रवेश

वर्धा, 9 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात अनेक धक्के बसले. त्यानंतर आता विदर्भातही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरू झालं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित दोन दिवसात समीर देशमुख यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले समीर देशमुख हे सहकार महर्षी आणि माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव आहेत. प्रा. सुरेश देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुलगाच आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याने पक्षाला चांगलाच धक्का बसला आहे.

दरम्यान, विविध जिल्ह्यांमध्ये पडझड होत असताना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. काँग्रेससोबत आघाडीचा फॉर्म्युला लवकरात लवकर निश्चित करून युतीसमोर आव्हान निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीचे सात उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती तसंच उमेदवारांच्या नावावरही चर्चा झाली. कोणत्या मतदारसंघात आपली शक्तीस्थानं काय आहेत आणि काय नकारात्मक बाजू आहेत, याबाबतही खलबतं झाली. तसंच विधानसभेतील उमेदवारीसाठी पक्षातील काही दिग्गज नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. तसंच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, नवाब मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Loading...

VIDEO: अखेर गणेश नाईकांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, यासोबत टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...