राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षाकडून फटाके विक्रेत्याला बेदम मारहाण

राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षाकडून फटाके विक्रेत्याला बेदम मारहाण

फटाके देण्यास मनाई केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अग्रवाल यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

  • Share this:

हिंगोली, 11 नोव्हेंबर : फटाके देत नसल्याच्या रागातून हिंगोली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे याने फटाके विक्रेत्याला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी बालाजी घुगे याच्यासह इतर नऊ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामलीला मैदानावर काल (शनिवार) पहाटे बालाजी घुगे याने फटका सेंटर परिसरात जमाव एकत्र करत श्याम अग्रवाल यांना फटाके मागितले. त्यांनी फटाके देण्यास मनाई केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अग्रवाल यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

पैशांचं काम असल्याने मी हे दुकान आता विकलं आहे, असं अग्रवाल यांनी बालाजी घुगे यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र बालाजी घुगे आणि त्यांचे सहकारी काहीही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. बालाजी घुगे हे अग्रवाल यांच्याकडे फटाक्यांची मागणी करतच राहिले. आणि नंतर त्यांनी थेट अग्रवाल यांना मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पो.नी. उदयसिंह चंदेल यांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. अग्रवाल यांना मारहाण होत असल्याचा सर्व प्रकार मोबाइल मध्ये रेकॉर्ड झाला आहे.

पोलीस कर्मचारी आल्यानंतरही मारहाण व शिवीगाळ सुरूच होती. एवढेच नव्हे तर अग्रवाल यांना आरोपीने जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवक जिल्हा अध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्याने मात्र एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हाध्यक्षाचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे रात्री दहा वाजल्यानंतर फटाके फोडण्यास बंदी असताना रात्री 2 वाजता फटाके मागण्यासाठी बालाजी घुगे आणि त्याचे साथीदार का गेले, असाही प्रश्न उपस्थित केला जात

आहे .

 

VIDEO : 'हे भगवान', 'गर्ल पॉवर' अशी व्हॉट्सअॅपची भन्नाट स्टिकर वापरायची कशी?

 

First published: November 11, 2018, 2:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading