मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बाईकवर टेम्पो घालून 2 शिवसैनिकांना चिरडलं; राष्ट्रवादीच्या 5 कार्यकर्त्यांना अटक

बाईकवर टेम्पो घालून 2 शिवसैनिकांना चिरडलं; राष्ट्रवादीच्या 5 कार्यकर्त्यांना अटक

 खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता असताना शिवसेनेतील सदस्यामध्ये मतभेद झाल्याने सभापतीपदावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू झाला

खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता असताना शिवसेनेतील सदस्यामध्ये मतभेद झाल्याने सभापतीपदावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू झाला

Shivsena Workers Murder in Solapur: काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांकडून दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. आरोपींनी टेम्पो दुचाकीवर घालून ही हत्या केली होती.

सोलापूर, 03 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वी सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ येथे राष्ट्रवादीच्या (NCP) काही कार्यकर्त्यांकडून दोन शिवसैनिकांची हत्या (2 Shivsainik Murder) करण्यात आली होती. आरोपींनी टेम्पो दुचाकीवर घालून ही हत्या केली होती. हत्या करून हा अपघात असल्याचा बनाव आरोपींकडून रचला होता. हत्या केल्यानंतर संबंधित आरोपींनी कर्नाटकात पलायन केलं होतं. घटनेच्या 20 दिवसांनंतर पोलिसांनी 5 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संतोष सुरवसे, रोहित फडतरे, पिंटू सुरवसे, आकाश बरकडे आणि संदीप सरवदे अशी आरोपींची नावे आहेत. तर सतीश नारायण क्षीरसागर आणि विजय सरवदे असं हत्या झालेल्या शिवसैनिकांची नावं आहेत. आरोपींनी 15 जुलै रोजी रात्री उशीरा दुचाकीवरून जाणाऱ्या या दोघांची हत्या केली होती. मृत क्षिरसागर आणि सरवदे दुचाकीवरू जात असताना आरोपींनी टेम्पो अंगावर घालून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या दुर्दैवी घटनेत सतीश क्षिरसागर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर विजय सरवदे यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली होती.

हेही वाचा-पुणे हादरलं! पैसे परत घ्यायला गेला अन् परतलाच नाही; स्मशानभूमीतच तरुणाचा शेवट

याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा अनिल फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश बरकडे, संदीप सरवदे आणि टेम्पो चालक भय्या असवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. टॅम्पोचालक भय्या असवले याला पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. त्यानंतर आता अन्य पाच आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा-एका हातानं गळा अन् दुसऱ्या हातानं दाबलं तोंड; 2वर्षाच्या मुलीचा आईनंच घेतला जीव

हत्येचं नेमकं कारण काय?

चार महिन्यांपूर्वी मोहोळमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. दरम्यान शहरातील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये काही बोगस मतदार नोंदणी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मृत सतीश क्षीरसागर आणि जखमी विजय सरवदे यांनी प्रांताधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती. संबंधित तक्रारीची दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी बोगस नावं कमी केली होती. याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात रोष होत्या. यातूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सूड उगवला आहे.

First published:

Tags: Crime news, Murder, NCP, Shivsena