राष्ट्रवादीच्या रेखा जरे हत्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, मास्टरमाइंड फरारच

राष्ट्रवादीच्या रेखा जरे हत्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, मास्टरमाइंड फरारच

रेखा जरे यांच्यावर 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता.

  • Share this:

अहमदनगर, 3 डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे (Rekha Jare) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे.

फिरोज शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर भिंगारदिवे आणि पवार अशी आरोपींची नावं आहेत. मात्र, या प्रकरणातील मास्टरमाइंड अद्याप फरारच आहे. पोलिसांची पाच पथके त्याच्या मागावर असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा...वेळ आली होती पण...मजूराचा हात लिफ्टमध्ये अडकून तुटला आणि...

रेखा जरे यांच्यावर 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. मोटरसायकल (क्रमांक एम एच 17-2380) वरून आलेल्या दोन अज्ञात 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घातला होता. काही वेळाने या तरुणांनी धारदार शस्त्रानं रेखा जरे यांच्या गळ्यावर वार केले होते.

गंभीर जखमी अवस्थेत रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 5 पथके तयार केली होती.

सुपारी देऊनच हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा

रेखा जरे यांची हत्या सुपारी देऊनच केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. सुरुवातील त्यांच्या गाडीला कट मारल्याचा कारणावरून त्यांचावर हल्ला करण्यात आला असं सांगण्यात आलं होतं. पण पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता धक्कादायक कारण समोर आले.

हेही वाचा...जेलमधून सुटल्यावर चरस तस्काराची जंगी मिरवणूक, साथीदारांचा रस्त्यावर धिंगाणा

रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोल्हापूरमधून फरार आरोपीला अटक केली आहे. रेखा जरे यांची हत्या करण्यामागे कारण काय आहे, याचा तपास पोलीस करीत करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी काल तीन आरोपींना अटक केली. राहता तालुक्यातील कोल्हार परिसरातून रात्री दोघांना आणि कोल्हापूर येथून एकाला अटक करण्यात आली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 3, 2020, 12:38 PM IST

ताज्या बातम्या