अंबरनाथ, 11ऑक्टोबर : महाविकास आघाडी सरकारमधील (mva government) तिन्ही पक्षांनी आज महाराष्ट्र बंद (maharashtra bandh) पुकारला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी तिन्ही पक्षाचे नेते रस्त्यावर उतरले आहे. तर दुसरीकडे अंबरनाथमधील (ambarnath) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) पदाधिकाऱ्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पश्चिमेतील मोहन सबरबिया (mohan suburbia ambernath) या उच्चभ्रु गृहसंकुलात ही घटना घडली.
मोहन सबरबियामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांनी इथे राहणाऱ्या राकेश पाटील यांना टँकर आणण्यासाठी सांगितले होते. पाटील यांनी पाण्याचा टँकर मागवला मात्र यावरून वाद झाला. या वादातून राकेश पाटील आणि कृष्णा रसाळ पाटील यांच्या मुलामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर याचे रुपांतर हाणामारीत झाले. पण, कृष्णा पाटील आणि त्यांच्या मुलानेच आपल्यावर जीवघेणा हल्ला केला असा आरोप जखमी झालेल्या राकेश पाटील यांनी केला.
दिल्लीच्या पराभवानंतर पॉन्टिंगचं पंतकडं बोट, चुकांची जबाबदारी कॅप्टनवर ढकलली
कृष्णा रसाळ पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस आहेत. मात्र राकेश पाटील यांनीच आधी माझ्या मुलावर हल्ला करत मारहाण करून त्याला जखमी केल्याचा आरोप राष्ट्रवादी सरचिटणीस कृष्णा रसाळ पाटील यांनी केला आहे.
मोठी कारवाई! पुण्यात लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 6तरुणींची सुटका
दरम्यान, अंबरनाथ पालिकेची निवडणूक जवळ आली असून राकेश पाटील हे या परिसरातून काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार चरण रसाळ यांचे समर्थक आहेत. तर याच भागातून कृष्णा रसाळ हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी ही हाणामारी झाल्याची चर्चा सुरू आहे. तर या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: अंबरनाथ