मुंबई, 28 एप्रिल : राज्यातील कोरोना स्थिती चिंताजनक (Maharashtra Corona) असून कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिव्हीर औषधाचा (Remdesivir Injection) अजूनही योग्य पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. या औषधासाठी रुग्णांचे नातेवाईक वणवण फिरत आहेत, कुणाच्या वशिल्याने हे औषध मिऴेल का, याचा प्रयत्न करत आहेत. अहमदनगरचे खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी नगर जिल्ह्यातील रुग्णांसाठी थेट दिल्लीहून 19 एप्रिल रोजी खासगी विमानाने शिर्डीमध्ये हे औषध आणले. यावरून त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी टीका केली होती. सुजय विखे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, आता एक ट्विट करून चाकणकर यांनी सुजय विखेंना विनंती केली आहे की, मानवतेच्या भावनेतून सुजय विखेंनी लस कोठे मिळते ते आम्हालाही सांगावे.
खा.सुजय विखे डॉक्टर आहेत, डॉक्टरांना जीवाचे मोल असते. मानवतेच्या भावनेतून सुजय विखेंनी कोठे लस मिळते ते सांगावे,याचा फायदा सर्वांनाच होईल. नगर जिल्हा हा महाराष्ट्रातच आहे.आमच्याकडेही लोक इंजेक्शनबद्दल विचारतात. तुम्ही आम्हालाही रेमडेसिवीर कसं आणायचं हे सांगाल ही अपेक्षा आहे.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 27, 2021
सुजय विखे हे स्वत: न्यूरोसर्जन आहेत. खासदार म्हणून जनतेची काळजी आहे, पण डॉक्टर या नात्याने डोळ्यासमोर वीस-बावीस वर्षांची तरुण मुले मरताना पाहून आपले मन हेलावले. त्यामुळे आपले दिल्लीत असलेले वैयक्तिक संबंध पणाला लावून तीनशे रेमडेसेवीर इंजेक्शन मिळविल्याचे त्यांनी सांगितले. स्वखर्चाने इंजेक्शन जेट विमानातून नगर जिल्ह्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले होते. ही इंजेक्शन शिर्डीच्या साईबाबा रुग्णालय, लोणी येथील प्रवरा रुग्णालय आणि नगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रत्येकी शंभर पोहोच करण्यात आली.
हे वाचा - सत्तरीतही आजीबाई झाल्या बिझनेसवुमेन; 77 व्या वयात सुरू केलं स्वत:चं फूड स्टार्टअप
याबबत आता राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून, खासदार सुजय विखे डॉक्टर आहेत, डॉक्टरांना जीवाचे मोल असते. मानवतेच्या भावनेतून सुजय विखेंनी कोठे लस मिळते ते सांगावे, याचा फायदा सर्वांनाच होईल. नगर जिल्हा हा महाराष्ट्रातच आहे. आमच्याकडेही लोक इंजेक्शनबद्दल विचारतात. तुम्ही आम्हालाही रेमडेसिवीर कसं आणायचं हे सांगाल ही अपेक्षा आहे, असे म्हटले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
19 एप्रिल रोजी खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर दिल्लीहून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा खास चार्टर विमानाने दिल्लीहून अहमदनगर जिल्ह्यात आणला होता. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावर अक्षेप घेतला होता. सुजय विखे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका देखील दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने विखे यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी असे म्हटले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.