विधानसभा निवडणुकीत शरद पवार 'भाकरी' फिरवणार, जुन्यांची चिंता वाढली

कार्यकर्त्यांनी राबायचं आणि नेत्यांच्या मुलांनी पदं घ्यायची त्यामुळे सामान्य कार्यकर्ते दुखावले जातात. यात बदल करण्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 03:17 PM IST

विधानसभा निवडणुकीत शरद पवार 'भाकरी' फिरवणार, जुन्यांची चिंता वाढली

सागर कुलकर्णी मुंबई 10 जून : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यातून धडा घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पक्षाच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी त्याचे स्पष्ट संकेत दिलेत. लोकांना परिवर्तन हवं आहे. त्यामुळे नव्या चेहेऱ्यांना, नव्या रक्ताला संधी दिली पाहिजे, येत्या विधानसभा निवडणुकीत हा बदल करावा लागेल असंही पवारांनी नेत्यांना स्पष्टपणे सांगितलं.

पवार आपल्या भाषणात म्हणाले, नवीन पिढीला निवडणूक प्रक्रियेत संधी दिली पाहिजे. लोकांना बदल हवा आहे. नवीन चेहेऱ्यांना संधी दिली पाहिजे. कष्टकरी तरूण चेहरांना संधी दिली पाहिजे. हा सर्व बदल करण्याची खबरदारी प्रदेशाध्यक्षांनी घ्यावी अशी सूचनाही पवारांनी केली.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नव्या तरुणांना संधी देण्याची शक्यता आहे. प्रस्थापीत आणि गेली अनेक वर्ष सत्तेचा मलिदा खाणाऱ्या नेत्यांचा लोकांना कंटाळा आलाय. त्याची जाणीव शरद पवारांना झाली आहे. या नेत्यांवर लोकांचा राग असल्याने पक्षाची दुरावस्था झाली त्यामुळे जुन्या नेत्यांना डावलून नव्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याने जुन्या नेत्यांची चिंता वाढली आहे.

कार्यकर्त्यांनी राबायचं आणि नेत्यांच्या मुलांनी पदं घ्यायची असं सगळ्याच राजकीय पक्षात सुरू आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते दुखावले जातात. याचा फटका सर्वच विरोधी पक्षांना बसल्याने शरद पवारांनी नवी योजना आखल्याचं बोललं जातंय.

आणखी काय म्हणाले शरद पवार?

Loading...

देशाचे पंतप्रधान हे एक दिवस गुहेत जावून बसतात. यातून विज्ञान युगात जाणाऱ्या आपल्या देशाला तरुणाला  काय संदेश मिळतो? लोकशाही चिरंतन टिकवायची असेल तर लोकांना याचा विचार करावा लागेल.

मुंबईत पक्षाची ताकद कमी आहे, विस्तार वाढवावा लागेल. पक्षाचा चेहेरा ग्रामीण आहे तो बदलावा लागेल. आता शहरीकरण वाढतंय त्यामुळं लक्ष द्यावे लागेल.

50 टक्के नागरिकीकरण झालं आहे. त्यामुळे दुर्लक्ष करता येणार नाही. आपल्या पक्षाची व्याप्ती शहरी भागात वाढवावी लागेल तरच यश मिळेल.

संपर्क कार्यपद्धती यात बदल झाला पाहिजे. लोकांपर्यंत सहज  पोहचण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला पाहिजे.

EVMवरून मतभेद

EVMच्या मुद्यावरून शरद पवारांनी पुन्हा एकदा शंका व्यक्त केली. यावर लोकांच्या मनात शंका आहेत त्यामुळे यावर पुन्हा एकदा तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर याच मुद्यावर अजित पवार यांनी EVM ला दोष न देता कामाला लागण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यामुळे या मुद्यावर अजित पवार आणि शरद पवारांमध्ये मतभेद आहेत का अशीही चर्चा आता सुरू झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 03:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...