मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भुजबळांच्या विधानानं उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स वाढला; कुणाचा पत्ता होणार कट?

भुजबळांच्या विधानानं उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स वाढला; कुणाचा पत्ता होणार कट?

संध्याकाळी शिवाजी पार्कवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते शपथ घेतील, हे स्पष्ट झालं आहे. पण ते नेते कोण हे अद्याप स्पष्ट नाही. त्यातच छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

  • Published by:  Arundhati Ranade Joshi
पुणे, 28 नोव्हेंबर : संध्याकाळी शिवाजी पार्कवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते शपथ घेतील, हे स्पष्ट झालं आहे. पण ते नेते कोण हे अद्याप स्पष्ट नाही. अजित पवारांचं काय होणार हा खरा प्रश्न आहे, तसा जयंत पवारांचा पत्ता तर कट होणार नाही ना, अशी शंका आता निर्माण झाली आहे. कारण आहे छगन भुजबळांचं ताजं वक्तव्य. 'आजच्या शपथविधीसाठी शरद पवारांनी दोन नेत्यांना निवडलंय, त्यातला एक मी आहे', अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुण्यात दिली. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. पुण्यात महात्म फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात छगन भुजबळ उपस्थित होते. तिथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना भुजबळ म्हणाले, "राष्ट्रवादीचे 2 नेते आज शपथ घेतील. पवारांनी जी दोन माणसं निवडली आहेत, त्यातला एक मी आहे."  भुजबळांच्या या वक्तव्यावर त्यांना अजित पवारांच्या मंत्रिपदाबद्दल विचारल्यावर, "अजित पवारांच्या मंञीपदासंबंधीचा निर्णय शरद पवारच घेतील", असं ते म्हणाले. "अजितदादांनी परत यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. जी जबाबदारी शरद पवार अजित पवारांवर टाकतील ते ती निभावतील", असंही त्यांनी सांगितलं. संबंधित - अजित पवारांची नाराजी कायम? ऐन शपथविधीच्या दिवशी 'नॉट रिचेबल' छगन भुजबळ हे शिवाजी पार्कवरच्या शपथविधी कार्यक्रमात शपथ घेतील, हे आता स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार, अशीही सूत्रांची माहिती आहे. म्हणजे जयंत पाटील यांचा पत्ता कट होणार का? की त्यांना इतर कुठली मोठी जबाबदारी देणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भुजबळ असंही म्हणाले की, "मंत्रिपदाची निश्चिती अद्याप झालेली नाही. विश्वादर्शक ठराव मंजूर करून घेणं हे आमच्यापुढचं आत्ताचं महत्वाचं काम आहे." संबंधित - संजय राऊत यांचं पंतप्रधान मोदींबद्दल मोठं विधान; खडसेंबद्दलही केला गौप्यस्फोट हे सरकार चालेल. त्यासाठी मी पुढाकार घेणार, मला तिन्ही पक्षात काम केल्याचा अनुभव आहे, असंही ते म्हणाले. जबाबदारी मिळाल्यास संकट मोचकाची भूमिका पार पाडणार. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अग्रक्रम देणार. कर्जमाफीचॆ आश्वासन पूर्ण करणार, असं छगन भुजबळ म्हणाले.
 
First published:

पुढील बातम्या