राष्ट्रवादीचं स्वप्न विधानसभेची सत्ता, कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी नेत्यांचा आटापिटा

राष्ट्रवादीचं स्वप्न विधानसभेची सत्ता, कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी नेत्यांचा आटापिटा

राष्ट्रवादी पक्षाला लोकसभा निकालाच्या धक्कातून बाहेर येत पुन्हा एकदा उभारी घेणं थोडे कठीण आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जून : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2019मध्ये आता राष्ट्रवादी पक्षाला सत्तेचे वेध लागले आहेत. पण भ्रष्टाचाराच्या चेहरे बदलत येत्या विधानसभेत सत्ता हस्तगत करण्याचा आव्हान त्यांच्यासमोर आहे.

'दौड में शामील हो जीत हो या हार...थंबना मत रूकना मत दौड में शामील हो...' अशी कविता धनंजय मुंडे यांनी आजच्या आयोजीत कार्यक्रमात म्हटली. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यातून धडा घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पक्षाच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी त्याचे स्पष्ट संकेत दिलेत.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कविता सादर करून मानसिक खचलेल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी पक्ष गेली 5 वर्ष सत्तेपासून दूर होता. त्यात पक्षातील अनेक दिग्गज नेते पद सोडून गेले. लोकसभा निवडणुकीत फारसं यश मिळालं नाही. तर विधानसभेच्या आशाही संपत चालेल्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.

हेही वाचा : भाविकांवर काळाचा घाला, बस अपघातात 11 जणांचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला याचा विचार करत बसण्यात काय अर्थ आहे. उलट आता येणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी काम केलं पाहिजे असं राष्ट्रवादी नेते अजित पवार म्हणाले तर शहरी भागात लक्ष देऊन तरुण आणि नवीन चेहऱ्यांना विधानसभेसाठी संधी दिली जाईल असं शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी पक्षाला लोकसभा निकालाच्या धक्कातून बाहेर येत पुन्हा एकदा उभारी घेणं थोडे कठीण आहे. राष्ट्रवादी लोकसभेप्रमाणेच विधानसभेत जर फार यश दाखवू शकली नाही तर मात्र पक्षाच्या भवित्तव्यायाविषयी न बोलेल बरं.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार 'भाकरी' फिरवणार, जुन्यांची चिंता वाढली

लोकांना परिवर्तन हवं आहे. त्यामुळे नव्या चेहेऱ्यांना, नव्या रक्ताला संधी दिली पाहिजे, येत्या विधानसभा निवडणुकीत हा बदल करावा लागेल असंही पवारांनी नेत्यांना स्पष्टपणे सांगितलं.

पवार आपल्या भाषणात म्हणाले, नवीन पिढीला निवडणूक प्रक्रियेत संधी दिली पाहिजे. लोकांना बदल हवा आहे. नवीन चेहेऱ्यांना संधी दिली पाहिजे. कष्टकरी तरूण चेहरांना संधी दिली पाहिजे. हा सर्व बदल करण्याची खबरदारी प्रदेशाध्यक्षांनी घ्यावी अशी सूचनाही पवारांनी केली.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नव्या तरुणांना संधी देण्याची शक्यता आहे. प्रस्थापीत आणि गेली अनेक वर्ष सत्तेचा मलिदा खाणाऱ्या नेत्यांचा लोकांना कंटाळा आलाय. त्याची जाणीव शरद पवारांना झाली आहे. या नेत्यांवर लोकांचा राग असल्याने पक्षाची दुरावस्था झाली त्यामुळे जुन्या नेत्यांना डावलून नव्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याने जुन्या नेत्यांची चिंता वाढली आहे.

कार्यकर्त्यांनी राबायचं आणि नेत्यांच्या मुलांनी पदं घ्यायची असं सगळ्याच राजकीय पक्षात सुरू आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते दुखावले जातात. याचा फटका सर्वच विरोधी पक्षांना बसल्याने शरद पवारांनी नवी योजना आखल्याचं बोललं जातंय.

शरद पवारांचा पॉलिटिकल 'एअर स्ट्राईक' पाहा SPECIAL REPORT

First published: June 10, 2019, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading