Home /News /maharashtra /

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून घडली मोठी चूक, प्रजासत्ताक दिनी वापरला देशाचा चुकीचा नकाशा

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून घडली मोठी चूक, प्रजासत्ताक दिनी वापरला देशाचा चुकीचा नकाशा

या चुकीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत अकाऊंट ट्रोल होत आहे.

  मुंबई, 27 जानेवारी : काल देशाचा 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्षांनी समाज माध्यमांवरुन शुभेच्छा व्यक्त केल्या. मात्र या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एक मोठी चूक झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबूक अकाऊंटवरुन देशाच्या नकाशाचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. मात्र या छायाचित्रातील नकाशाच चुकीचा देण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर समाज माध्यमातून टीका केली जात आहे. काल प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या अधिकृत फेसबूक व ट्विटर अकाऊंटवरुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्याकरिता देशाचा नकाशा पोस्ट केला आहे. नकाशाखाली ‘लोकशाहीचा उद् घोष करणारे भारतीय प्रजासत्तक चिरायू होवो, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’ असा आशय दिला आहे. मात्र देशाचा नकाशात मात्र त्यांनी मोठी चूक केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेअर केलेल्या देशाच्या नकाशाच जम्मू-काश्मिर व लडाखची सीमारेषा चुकली आहे. या नकाशात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे भाग वगळण्यात आले आहे. देशाच्या अधिकृत नकाशाऐवजी दुसरात नकाशा यासाठी वापरण्य़ात आला आहे. या चुकीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत अकाऊंट ट्रोल होत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून समाज माध्यमांवर राजकीय पक्षांकडून अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतंत्र सोशल मीडिया टीम कार्यरत असते. गेल्या काही वर्षा राजकीय नेतेदेखील स्वत:ची स्वतंत्र सोशल मीड़िया टीम उभी करतात. सध्या राजकीय प्रचाराचं तंत्र बदललं आहे. घरोघरी प्रचार करण्यापेक्षा नेतेमंडळी अशा व्यासपीठांवरुन प्रोप्रोगंड़ा करीत आहेत. अन्य बातम्या

  पाकिस्तानातील हिंदू मंदिरावर हल्ला, देवीच्या मूर्तीची तोडफोड दुबईत मागितली नोकरी; कंपनीने सांगितलं CAA विरोधात आंदोलन करा, चांगली कमाई होईल

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Ajit pawar, Cong ncp, India map, Maharashtra, शरद पवार

  पुढील बातम्या