राजकारणातून अलिप्त व्हावसं वाटतंय, उदयनराजेंचं खळबळजनक वक्तव्य

राजकारणातून अलिप्त व्हावसं वाटतंय, उदयनराजेंचं खळबळजनक वक्तव्य

भाजप प्रवेशाच्या चर्चेबद्दल विचारला असताना उदनयराजे भडकल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

सातारा, 30 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. या भाजप प्रवेशाच्या चर्चेबद्दल विचारला असताना उदनयराजे भडकल्याचं पाहायला मिळालं.

'मला तर आता असं वाटतंय की राजकारणातूनच अलिप्त व्हावं,' असं म्हणत उदयनराजे यांनी पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे. एकीकडे उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींनी वेग पकडला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसणार, हे आता जवळपास निश्चित आहे. कारण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा आहे. मात्र उदयनराजेंच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तारखेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र उदयनराजे अमित शहा यांच्या नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे. जोरदार शक्तीप्रदर्शनासह उदयनराजेंना पक्षात घेण्याचा भाजपचा विचार आहे.

SPECIAL REPORT : पुण्यात भाजपकडून कोणाला संधी? जागा 8 आणि इच्छुक उमेदवार तब्बल 130

Published by: Akshay Shitole
First published: August 30, 2019, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading