कोणता झेंडा घेऊ हाती? 'फायनल' निर्णय घेण्यासाठी उदयनराजेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

कोणता झेंडा घेऊ हाती? 'फायनल' निर्णय घेण्यासाठी उदयनराजेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

कार्यकर्त्यांशी चर्चा करून उदयनराजे राष्ट्रवादीत राहायचं की भाजपमध्ये जायचं, याचा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सातारा, 9 सप्टेंबर : भाजप प्रवेशाबाबत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले अजूनही संभ्रमात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी उदयनराजेंनी पुण्यात आज कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करून उदयनराजे राष्ट्रवादीत राहायचं की भाजपमध्ये जायचं, याचा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत काही दिवसांपूर्वी जोरदार हालचाली झाल्या होत्या. मात्र आगामी काळातील आव्हानांचा विचार करता उदयनराजेंनी या निर्णयावर लगेच शिक्कामोर्तब टाळलं. त्यानंतर उदयनराजे यांच्या अनेक नेत्यांसोबत बैठका झाल्या. राष्ट्रवादीतील नेत्यांनीही उदयनराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

उदयनराजे आज देणार खासदारकीचा राजीनामा?

उदयनराजे भोसले आज (सोमवार) खासदारकीचा राजीनामा देण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपमध्ये प्रवेश करायचा असेल तर उदयनराजेंना आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा पोटनिवडणुकीचा सामना करावा लागेल.

राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठीही नाही सोपं

राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. 'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.

SPECIAL REPORT: ...तो पर्यंत युती कायम, आंबेडकरांकडून जलील यांच्या ऐवजी ओवेसींनी महत्त्व

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 09:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading