कोल्हापुरात राष्ट्रवादीचा झेंडा, महापौरपदी सुरमंजिरी लाटकर यांची निवड

कोल्हापुरात राष्ट्रवादीचा झेंडा, महापौरपदी सुरमंजिरी लाटकर यांची निवड

कोल्हापूर महानगरपालिकेच्या 49 व्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 19 नोव्हेंबर : राज्यात सत्तास्थापनेसाठी नव्या समीकरणांची नांदी झाल्यानंतर कोल्हापूर महापालिकेत नक्की काय होणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 49 व्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांनी 9 मतांनी भाजपा आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांचा पराभव केला आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवार सुरमंजिरी लाटकर यांना 43 मते मिळाली तर विरोधी भाजपा ताराराणी आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांना 32 मते मिळाली आहेत. त्यामुळे महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वांचं लक्ष शिवसेनेच्या भूमिकेकडे होतं. मात्र शिवसेनेचे चारही नगरसेवक गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं.

नवनिर्वाचित महापौर- सुरमंजिरी लाटकर

नवनिर्वाचित महापौर- सुरमंजिरी लाटकर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महापालिकांच्या महापौरपदांसाठीच्या आरक्षणासंदर्भातली लॉटरी काढण्यात आली असून यापुढच्या निवडणुकांमध्ये कुठल्या महापालिकांना महापौरपद आरक्षित असेल आणि कुठल्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल हे या लॉटरीच्या निकालामुळे निश्चित झालं आहे. महापौरपदासाठीच्या आरक्षणाच्या सोडतीत मुंबईसाठी मोठी बातमी आली आहे. आता मुंबईचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी (open) असेल. मुंबईप्रमाणेच पुणे, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली, सांगली आणि उल्हासनगर या महापालिका ओपन कॅटेगरीसाठी खुल्या झाल्या आहेत.

नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका खुल्या गटातील महिलांसाठी राखीव असेल. वेगवेगळ्या महापालिकांचे महापौरपदांच्या आरक्षणाचा निर्णय लॉटरी पद्धतीने होतो. कुठली महापालिका कुठल्या प्रवर्गासाठी खुली किंवा आरक्षित आहे याचा निकाल या ताज्या लॉटरीने लागला आहे.

महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीचे निकाल खालीलप्रमाणे

ओपन ( खुला) महिला

- चंद्रपूर

- नवी मुंबई

- जळगाव

- भिवंडी

- अकोला

-पनवेल

- पिंपरी चिंचवड

- औरंगाबाद

ओपन ( खुला प्रवर्ग)

- मुंबई

- पुणे

- नागपूर

- ठाणे

- नाशिक

-कल्याण डोबिंवली

- सांगली

- उल्हास नगर

VIDEO: सत्ता स्थापनेवरुन शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ, पाहा काय म्हणाले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2019 12:17 PM IST

ताज्या बातम्या