'...म्हणून उद्धव ठाकरेंनी राज यांची बाजू घेतली', ED प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 02:23 PM IST

'...म्हणून उद्धव ठाकरेंनी राज यांची बाजू घेतली', ED प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

ठाणे, 22 ऑगस्ट : 'ED ची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी सरकारविरोधात आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या ईडी चौकशीप्रकरणी सरकारवर टीका करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांना दिलेल्या पाठिंब्यावरही भाष्य केलं आहे. 'बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार अजूनही जिवंत आहेत, यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान,कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (गुरुवारी) ईडीसमोर चौकशी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालय, कृष्णकुंज आणि दक्षिण मुंबई परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलं आहे. मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आलं आहे. ही कोणतीही कारवाई नसून खरबरदारी म्हणून उचललेलं पाऊल आहे, असं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं आहे.

मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर संतोष धुरी यांना कीर्ती कॉलेज परिसरात पोलिसांकडून नेण्यात आलं आहे.

Loading...

VIDEO : 'राज ठाकरेंच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर आम्ही...', मनसे नेत्याचा थेट इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 02:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...