'56 इंच छातीचं काय करायचं, 56 इंच का दम चाहीए'

'56 इंच छातीचं काय करायचं, 56 इंच का दम चाहीए'

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

  • Share this:

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

बारामती, 08 एप्रिल : '56 इंच छातीला काय करायचं आहे. त्यांच्या 56 इंच छातीमध्ये दम पाहीजे' असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता लगावला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचं उदाहरण देत त्यांनी जगताप यांचं कौतुक केले. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे संजय काकडे यांनी निवडणुकीचा प्रचार करायला नकार दिला होता. त्यांची समजूत काढण्यासाठी, दिवंगत पतंगराव कदम आणि चंदुकाका जगताप या वरिष्ठांनी प्रयत्न केला असताना देखील त्यांनी निवडणुकीत साथ दिली नाही.

हेही वाचा: फडणवीसांचा डबल अॅटॅक, काँग्रेसनंतर पवारांनाही मोठा धक्का

पण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय जगताप यांना विचारलं असता? त्यांनी बारामतीपेक्षा अधिकचा प्रचार करण्यास सुरुवात केली. असं सांगून सुळे म्हणाल्या एखादी गोष्ट नाही करायची तर, नाहीच केली. अशी हिंमत संजय जगताप यांच्यासारखी असली पाहिजे.

56 इंच छातीला काय करायचं आहे. त्यांच्या 56 इंच छातीमध्ये दम पाहीजे. असा टोलाही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता लगावला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

अजित पवार जेव्हा बारामतीतल्या कार्यकर्त्यांना फैलावर घेतात...

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या निमित्त राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत तळ ठोकला. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील हे शेतकरी वाटतात का? असा सवाल करत शेतकरी म्हणून तुमची ओळख होते का? असा टोला अजित पवार यांनी लगावला.

बारामती शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले, 'मला पाहिजे तसा प्रचार या मतदारसंघात अजून सुरू झालेला नाही. तुम्ही नगरपरिषदेच्या वार्डामध्ये जसे उभे राहता. तेव्हा कसा प्रचार करता? तसा प्रचार सुरू झाला पाहिजे. असा गर्भीत इशारा देत ते म्हणाले, ते मला काही सांगू नका. तुम्हाला वाटत असेल अजित पवार मावळात, शिरूरला, सातारला गेला. मात्र माझे लक्ष इथे असून मला सगळं कळतं. बिरोबाच्या देवळात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोणी हार घातला' हेदेखील सांगायला अजित पवार विसरले नाहीत.

2014 च्या निवडणुकीत बारामतीमधून सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य कमी झालं होतं. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. तिथून विक्रमी मतांनी पवार विजयी होतात. मात्र बदलत्या राजकारणामुळे हे मताधिक्य कमी होऊ नये याची राष्ट्रवादीला चिंता आहे. त्यामुळे अजित पवार बारामतीकडे खास लक्ष देत आहेत. तर राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी भाजपनेही जोर लावला.

VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'

First published: April 8, 2019, 9:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading