चंद्रकांत पाटलांविरोधात राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन, जाहीर केली भूमिका

चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 01:52 PM IST

चंद्रकांत पाटलांविरोधात राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन, जाहीर केली भूमिका

पुणे, 4 ऑक्टोबर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांच्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने मनसेचे कोथरूडमधील उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी याबाबत माहिती दिली.

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यावी, याबाबत आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. तसंच पाटील यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांचं एकच उमेदवार असावा, यासाठीही प्रयत्न केला जात होता. आता राष्ट्रवादीने याबाबत भूमिका घेत आपला पाठिंबा मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर केला आहे.

दरम्यान, भाजपनं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळं सध्या सर्वांचं लक्ष्य या मतदारसंघाकडं लागलं आहे. गुरुवारी चंद्रकांत पाटलांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज भरला. मात्र, त्यापूर्वी त्यांना बंडोबांना थंड करण्याचं दिव्य पार पाडावं लागलं.

शक्तीप्रदर्शन करीत चंद्रकांत पाटलांनी पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात बंडाचे वारे वाहू लागले होते. जातपात आणि स्थानिक - बाहेरचा असा वाद पेटला होता. त्यामुळचं अर्ज दाखल करण्यापूर्वी स्वपक्षासोबतचं मित्रपक्षातील बंडोबांना थंड करण्याची कसरत चंद्रकांत पाटलांना करावी लागली. थेट जनतेतून निवडून येण्याचं पवारांनी दिलेलं आव्हान चंद्रकांत पाटलांनी केवळ स्वीकारलचं नाही तर यापुढे पुण्यावर आपलचं वर्चस्व राहणार असल्याचे संकेत त्यानी दिले.

VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...